आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिलाच 64 मेगापिक्सल कॅमरा असलेला स्मार्टफोन रिअलमी XT लाँच, 15,999 रुपयांपासून सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - चिनी कंपनी रिअलमीने शुक्रवारी आपला लेटेस्ट स्मार्टफोन रिअलमी XT भारतात लाँच केला आहे. या नवीन फोनमध्ये 4 रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. हा देशातील पहिलाच फोन आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सल कॅमरा सेन्सर देण्यात आला आहे. रॅम आणि स्टोरेजच्या दृष्टीकोनातून दोन व्हॅरिएंट लाँच करण्यात आले आहेत. त्यामध्ये बेस व्हॅरिएंटची किंमत 15,999 रुपये आणि टॉप व्हॅरिएंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन पर्ल ब्लू आणि पर्ल व्हाइट अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध राहील.

पहिली विक्री 16 सप्टेंबर रोजी
स्मार्टफोन पहिल्यांदा 16 सप्टेंबर रोजी सेल होणार आहे. हा फोन केवळ फ्लिपकार्ट आणि रिअलमी डॉट कॉमवरून खरेदी करता येईल. कंपनीने या फोनसोबत काही अॅक्सेसरीज सुद्धा लाँच केल्या. त्यामध्ये पॉवरबँक (1299 रुपये), वायरलेस बड्स (1799 रुपये) आणि रिअलमी XT चे प्रोटेक्टीव्ह केस (399 रुपये) सुद्धा लाँच केले आहेत.

रिअलमी XT चे सिफिकेशन्स

डिस्प्ले साइज6.4 इंच
डिस्प्ले टाइपफुल एचडी प्लस, सुपर एमोलेड, 1080x2340 पिक्सल रेजोल्यूशन, वॉटरड्रॉप नॉच, गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
ओएसएंड्रॉएड 9 पाई विद कलरओएस 6
प्रोसेसरऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 712
रैम4 जीबी/ 6 जीबी/ 8 जीबी
स्टोरेज64 जीबी/ 128 जीबी
रिअर कॅमेरा64MP(सॅमसंम ISOCELL ब्राइट GW1 सेन्सर)+8MP(वाइड रेंज)+2MP(मॅक्रो)+2MP(डेप्थ)
फ्रंट कॅमेरा16MP
कनेक्टिव्हिटीयूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक
बॅटरी4000 एमएएच विद 20W VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट
डायमेंशन158.7x75.16x8.55 एमएम
वजन183 ग्रॅम