आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Realme Yo Days Sale Will Start From 7 January 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 जानेवारीपासून सुरू होईल रिअलमी यो डेज सेल, 1 रूपयांत मिळतील इएरफोन आणि बॅकपॅक, स्मार्टफोन्सवरदेखील मिळेल आकर्षक ऑफर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील मोठी स्मार्टफोन ब्रँड रिअलमीने रिअलमी यो डेज सेलची घोषणा केली आहे, ज्याच्या अंतर्गत कंपनीच्या अॅक्सेसरीजवर विशेष सुटु दिली जाईल. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या घोषणेत सांगितले की, यांत रियलमी बड्स इअरफोन्स आणि रिअलमी बॅकपॅक्सदेखील मिळतील. त्याशिवाय रीअलमी यू1 4 प्लस 64 जीबीची विक्रीदेखील करण्यात येईल. या दरम्यान रिअलमी यू1 चा फायरी गोल्ड खरेदी करणाऱ्या प्रथम 500 ग्राहकांना अनेक गिफ्ट्स मिळतील. 
 

1 रूपयांत मिळेल 2399 रूपयांचे सामान
कंपनीने सांगितले की, यात रिअलमी बड्स, इएरफोन्स आणि बॅगपॅकची विक्री केली जाईल. या दरम्यान प्रथम 300 रिअलमी बॅकपॅक्स फक्त 1 रूपयांत मिळतील ज्याची मार्केट किंमत 2399 आहे.


40 लाख ग्राहकांसाठी सुरू केली सेल
रिअलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी सांगितले की, रिअलमी यो डेज अभियानाची संकल्पना आमच्या 40 लाख ग्राहकांसाठी सुरू केली आहे. आमचे यूझर्सच आमचे अम्बॅसिडर आहेत त्यामुळे त्यांना आनंदीत करण्यासाठी नवीन वर्षांची भेट म्हणून आम्ही ही सेल सुरू केली आहे.