Home | International | Other Country | Ghost Plane Helios, Which Crashed Killing 121 On Board, Here is The True Story of What Happened With The Silent Flight

Shocking : सर्व प्रवासी बेशुद्ध, कॉकपिटमध्ये पायलटही नव्हता, अपघातात 121 ठार.. कोडे कायम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 12:06 AM IST

असे म्हटले जात होते की, भूत-आत्मा यांच्या अभिशापामुळे विमानात असे काही घडले की सर्व बेशुद्ध झाले आणि विमान क्रॅश झाले.

 • Ghost Plane Helios, Which Crashed Killing 121 On Board, Here is The True Story of What Happened With The Silent Flight

  ग्रीस - युरोपमधील सायप्रस देशातील हेलियोस विमान अपघाताला अनेक वर्षांपासून गूढ म्हणून संबोधले जाते. ही युरोपीय इतिहासातील सर्वात मोठी विमान दुर्घटना समजली जाते. 2005 मध्ये जेव्हा या विमानाचा अपघात झाला होता तेव्हा असे म्हटले जात होते की, भूत-आत्मा यांच्या अभिशापामुळे विमानात असे काही घडले की सर्व बेशुद्ध झाले आणि 121 प्रवाशांसह हे विमान क्रॅश झाले होते. पण तपासामध्ये काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या होत्या.


  8 हजार फुटावर संपर्क तुटला
  14 ऑगस्ट 2005 ला या विमानाने सायप्रसहून ग्रीसकडे उड्डाण घेतले होते. पण 18 हजार फूट उंचीनंतर विमानाचा कंट्रोल रूमबरोबर संपर्क तुटला होता.


  अचानक वाजला अलार्म
  संपर्क तुटल्यानंतर पायलट आणि कंट्रोल टॉवरमध्ये बोलणे जाले. पायलट विमानात होणाऱ्या विचित्र गोष्टींचा उल्लेख करत होता. अचानक प्लेनमध्ये एक अलार्म वाजला. हा अलार्म ऐकूण लोकांना धक्का बसला. या अलार्मचा अर्थ विमान अद्याप उड्डाण घेण्यास सज्ज नाही. तेवढ्यात अपघात झाला.


  पायलटसह सर्व बेशुद्ध
  रिपोर्ट्समध्ये सोमर येते की, विमानाच्या केबीनमध्ये तापमान आणि दबाव खूप कमी झाल्यास ते क्रॅश झाले. त्यात संपूर्ण 121 लोकांचा मृत्यू झाला. तपासात विमानातू पाठवलेले विविवध प्रकारच्या संदेशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. एका मॅसेजमध्ये पायलटने प्रवासी थंडीमुळे गोठल्याचा उल्लेख केला तर दुसऱ्या मॅसेजमध्ये कंट्रोल टॉवरकडून तांत्रिक मदत मागताना संपर्क तुटतो.


  संपर्क तुटताच पाठवले लढाऊ विमान
  प्रवासी आणि पायलट बेशुद्ध झाल्याचे ऐकताच ग्रीस एअरफोर्सला माहिती देण्यात आली. एखादी दहशतवादी घटना असण्याच्या भीतीने एअरफोर्स दोन लढाऊ विमाने या विमानाच्या दिशेने पाठवते. त्यावेळी हे विमान अॅटो पायलट मोडवर 34 हजार फुटांवर पोहोचले. फायटर जेट काही मिनिटात फ्लाइटजवळ पोहोचले आणि आर्मीच्या पायलट्ना धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. आर्मीच्या पायलट्सने सांगितले की, हेलियोस विमानाच्या कॉकपिटमध्ये एक पायलट बेशुद्ध आहे. त्यामुळे विमान अॅटोमोड मध्ये गेल्याचे स्पष्ट होते. दुसऱ्या सीटवर कोपायलटही दिसत नाही. तसेच संपूर्ण विमानातील पॅसेंजरही बेशुद्ध होते. सर्वांचे ऑक्सिजन मास्क लटकलेले होते. त्यामुळे विमानात दबाव कमी असल्याचे स्पष्ट झाले.


  कॉकपिटमध्ये दिसला एक व्यक्ती
  विमानाच्या डाव्या बाजुला असलेल्या दुसऱ्या फायटर प्लेनच्या पायलटने हेलियोसच्या कॉकपिटमध्ये कोणाला तरी पाहिले. हा प्लाइट अटेंडंट होता असे समजले गेले. त्यानंतर लगेचच कंट्रोल रूमला याची माहिती देण्यात आली. एअर ट्राफिक कंट्रोलने हेलियोसशी संपर्काचा प्रयत्न केला पण काहीही उत्तर मिळाले नाही. तेवढ्यात विमानाच्या डाव्या इंजीनचे इंधन संपले आणि ते बंद झाले. विमान खाली जाऊ लागले. 10 मिनिटांनी दुसरे इंजीनही बंद झाले. एअरफोर्सने संभाव्य दुर्घटना क्षेत्राबाबत माहिती दिली. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांनी विमान अॅथेन्सहून 40 किलोमीटर अंतरावर एका डोंगरी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात क्रूसह सर्व 121 जणांचा मृत्यू झाला. अनेक पेपरमध्ये लोक बेशुद्ध झाल्याचे छापण्यात आले. लोकांनी त्याचा संबंध भुताशी लावला. पण ते खरे नव्हते.


  हे होते कारण
  अनेक वर्षांनी तपासाच धक्कादायक बाब समोर आली. एका छोट्याशा चुकीने 121 जणांनी प्राण गमावल्याचे सांगण्यात आले. ही चूक होती विमानाच्या एअरकंडिशनर आणि प्रेशर कंट्रोल सिस्टमची. एका दिवसापूर्वी ते खराब झाले होते. त्यानंतर रुटीन चेकअप करून त्यात दुरुस्ती करण्यात आली. पण चेकअपनंतर प्रेशर सिस्टीम मॅन्युअल मोडहून पुन्हा अॅटो करण्यात आली नव्हती. त्यामुळेच 18 हजार फूट उंचीनंतर विमानातील प्रेशर सिस्टीम फेल झाली आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक बेशुद्ध झाले. पायलटबरोबरही तेच घडले. बराचवेळ पायलटने रिस्पॉन्स दिला नाही म्हणून विमान अॅटोपायलट मोडवर गेले आणि इंधन संपल्याने ते दुर्घटनाग्रस्त झाले.

 • Ghost Plane Helios, Which Crashed Killing 121 On Board, Here is The True Story of What Happened With The Silent Flight
 • Ghost Plane Helios, Which Crashed Killing 121 On Board, Here is The True Story of What Happened With The Silent Flight

Trending