आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत याठिकाणी जंगलात पिंजऱ्यात कोंडून ठेवले जातात मृतदेह, यासाठी करतात असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आज आपण अमेरिकेतील एका अशा ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत ज्याठिकाणी माणसांच्या मृतदेहाला खुल्या आकाशाखाली महिनो-महिने तसेच सोजले जाते. असे एकाद्या समुदायाकडून किंवा प्रथेसाठी केले जाते असेही नाही. मग त्यामागचे नेमके रहस्य काय, याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 


हे ठिकाणी म्हणजे अमेरिकेतील दुसरे सर्वात मोठे राज्य टेक्सास. येथे एक अशी जागा आहे, ज्याठिकाणी मृतदेह मोकळ्या जागेत एका लोखंडी पिंजऱ्यात फेकून दिले जातात. याठिकाणी काही बेवारस मृतदेह आढळतात किंवा काही मृतदेह दान केले जातात. पण यामागे नेमके कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, टेक्सास स्टेट विद्यापीठाच्यामते मृतदेहांवर मोकळी हवा, पाणी, मीठ, आर्द्रता यांचा काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी असे केले जाते. तसेच किती दिवसांत मृतदेहांत कसे बदल होतात याचाही अभ्यास या माध्यमातून केला जात आहे. 


सहा महिने मृतदेह खुल्यावर सोडतात
याठिकाणी जवळपास सहा महिन्यांसाठी मृतदेह मोकळ्या जागेत सोडून दिले जात असतात. त्याचे कारण म्हणजे तपासात पोलिस आणि फॉरेन्सिक लॅबला मदत करणे. ज्यांच्या मृत्यूचे कारण समोर येत नाही, त्यांच्या मृत्यूचे कारण शोधणे अनेकदा कठीण ठरत असते. या सर्वांचा शोध घेणे पोलिसांनाही कठीण जाते. त्यामुळे या मृतदेहांवर प्रयोग केल्याने त्यांना मदत मिळते. इतर मृतदेहांशी यांची तुलना लावून काही अंदाज व्यक्त केले जातात. 


तपासानंतर सर्व पुरावे कोर्टात सादर केले जातात. पण काही गोष्टींची काळजी घेतली जाते. एक तर मृतदेह संक्रमित नसावा आणि त्याचे वजन 200 किलोपेक्षा जास्त नसावे. 

बातम्या आणखी आहेत...