आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांचा हा प्रवास अनेक अर्थांनी खास ठरला. पण वाजपेयी एका अत्यंत साधारण कुटुंबातील होते. त्यांनी राजकीय करिअर सुरू करण्यापूर्वी पत्रकारितेत काही काळ काम केले होते. पण पत्रकारिता करताना एका घटनेमुळे ते राजकारणाकडे वळाले होते.
यामुळे आले राजकारणात..
>> वाजपेयींनी स्वतः एका मुलाखतीत त्यांना पत्रकारितेतून राजकारणात आणणाऱ्या घटनेबाबत सांगितले होते.
>> वाजपेयी 1953 मध्ये पत्रकार म्हणून काम करत होते.
>> वाजपेयी पत्रकारिता करत असताना जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देण्याच्या विरोधात होते.
>> डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेल्या परमिट सिस्टीमचा विरोध करण्यासाठी त्याठिकाणी गेले होते.
>> या संपूर्ण घटनेचे वार्तांकन करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी हेदेखिल मुखर्जी यांच्याबरोबर गेले होते.
>> त्याचदरम्यानच्या काळात नजरकैदेत असताना सरकारी रुग्णालयात डॉ.मुखर्जी यांचा मृत्यू झाला.
>> मुखर्जी यांच्या मृत्यूमुळे वाजपेयी अत्यंत दुःखी झाले आणि त्यांचे काम पुढे नेण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली आणि राजकारणात प्रवेश केला.
>> त्यानंतर वाजपेयी यांनी मागे वळून पाहिले नाही. ते तीनवेळा देशाचे पंतप्रधान बनले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.