Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Reason Of Early Male Baldness

...तर यामुळे गळतात मुलांचे केस, असू शकतात ही मोठी कारणं

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 12:00 AM IST

आजच्या काळात खासकरुन पुरुषांचे केस गळण्याची समस्या दिसून येत आहे.

 • Reason Of Early Male Baldness

  आजच्या काळात खासकरुन पुरुषांचे केस गळण्याची समस्या दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एस्ट्रोजेनेटिक एलोपिका(मेल पॅटर्न बोल्डनेस) आहे जे पुरुषांमध्ये असणा-या DTH हार्मोन्सचे बॅलेंस बिघडल्यामुळे होते. यामध्ये पुरुषांच्या डोक्याच्या एका भागातील केस जलद गतीने गळतात. एका संशोधनानुसार 30 टक्के लोकांमध्ये ही समस्या 30 व्या वर्षापर्यंत होते.


  पुरुषांचे केस गळण्यामागे फक्त एस्ट्रोजेनेटिक एलोपिका हेच कारण नाही. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग अशाच अनेक कारणांविषयी सांगणार आहेत. ज्यामुळे कमी वयातच पुरुषांचे केस गळू लागतात. यासोबतच जाणुन घेऊया की, ही समस्या दूर करण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करु शकतो.

  फॅमिली हिस्ट्री
  टक्कल पडण्याला जेनेटिक्स जबाबदार असू शकतात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये पुरुषांचे केस कमी वयात गळाले असतील, तर तुमच्यासोबत असेच होऊ शकते.

  अनहेल्दी डायट
  डायटमध्ये योग्य प्रमाणात न्यूट्रीशन न घेतल्याने बॉडीवर आयरन, व्हिटॅमीन ए, प्रोटीन, झिंक, कॅल्शियम यांसारख्या न्यूट्रीशनची कमतरता निर्माण होते. यामुळे केस गळतात.


  स्मोकिंग

  तंबाखूमधील निकोटिनमुळे ब्लड नर्व्स संकुचित होतात. ज्यामुळे बॉडीचे ऑक्सीजन लेव्हल कमी होते, ज्यामुळे केसांना नुकसान पोहोचते.


  दारु
  जास्त दारु प्यायल्यामुळे बॉडीमध्ये टॉक्सिन्स वाढतात. यामुळे आयरन, झिंक, पाण्याची कमतरता होते. अशावेळी केस गळतात.


  स्ट्रेस
  स्ट्रेस वाढल्यावर बॉडी हार्मोन्स बॅलेंस बिघडते. ज्यामुळे केस गळण्याची समस्या होऊ शकते.


  स्किन इन्फेक्शन
  डोक्यात फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या झाल्यास केस जलद गळतात.


  औषधांचा साइड इफेक्ट
  अनेक वेळा संधिवात, हार्ट डिसिज, ब्लड प्रेशर, थायरॉइडसारख्या औषधांच्या साइड इफेक्टमुळे केस गळण्याची समस्या होते.


  केमिकल्सचा प्रभाव
  हेयर जेल, कलर्स, शाम्पू, कंडीशनरमधील केमिकल्सच्या साइड इफेक्टमुळे केस गळतात.


  हार्मोनल प्रॉब्लम
  पुरुषांमध्ये केस गळण्याची कॉमन कारण म्हणजे एन्टोजेनेटिक एलोपिका आहे. बॉडीमध्ये DTH हार्मोन बॅलेंस बिघडल्यामुळे ही समस्या होते.

Trending