Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | reason of gas in stomach

पोटात गॅस होण्याचीची समस्या असल्यास, आजपासूनच बंद करा या गोष्टी

हेल्थ डेस्क | Update - Feb 07, 2019, 12:01 AM IST

आजच्या काळात पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. येथे जाणून घ्या, कोणत्या गोष्टी अव

 • reason of gas in stomach

  आजच्या काळात पोटात गॅस होणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. टागोर हॉस्पिटल अँड हार्ट केअर सेंटर, जालंधरच्या डायटिशियन डॉ. मोनिषा सिक्का सांगत आहेत असे 8 काम, ज्यामुळे पोटात गॅस होतात. जर हे अवॉइड केले तर ही समस्या टाळता येऊ शकते.


  तेलकट पदार्थ
  तळकट पदार्थ म्हणजे भजे, सामोसे आणि कचोरीमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि यामुळे पोटात गॅस तयार होऊ लागतो.


  डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नयेत
  फॅट असलेले दूध, चीज यासारखे डेअरी प्रोडक्ट्स दूर ठेवा. यामध्ये असलेले फॅट पचत नाही. यामुळे गॅसची समस्या निर्माण होते.


  दारू पिऊ नये
  बिअर आणि वाईन शरीरात अॅसिड निर्माण करते. याचे जास्त प्रमाण झाल्यास पोटात गॅस तयार होऊ लागतो.


  कोल्ड्रिंक घेऊ नये
  सोडा आणि कोल्ड्रिंकमध्ये कार्बनडायऑक्साइड बबल्स आढळून येतात, जे पोटात जाऊन अॅसिड तयार करतात. यामुळे पोटात गॅसची समस्या सुरु होते.


  जास्त गोड खाऊ नये
  प्रोसेस्ड फूड उदा. कुकीज, ब्राउनीज आणि मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पटत लगेच गॅस तयार होऊ लागतो.


  सतत बसून राहणे
  अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम केल्यास अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. यामुळे पोटात गरजेपेक्षा जास्त अॅसिड तयार होऊन गॅसची समस्या निर्माण होते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या दोन गोष्टींपासून दूर राहावे...

 • reason of gas in stomach

  घाईघाईत खाणे
  असे केल्याने अन्न व्यवस्थित चावले जात नाही आणि यामुळे अन्न पचण्यास वेळ लागतो आणि अॅसिड तयार होऊ लागते. यामुळे गॅसची समस्या निर्माण होते.

 • reason of gas in stomach

  उशिरापर्यंत जागरण
  रात्री खूप वेळ जागरण केल्यास अपचनाची समस्या निर्माण होऊ लागते. यामुळे पोटात गॅस तयार होऊ लागतो.

Trending