आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळे पत्नीवर संशय करू लागतात पती, तुम्हीही असे करत असाल तर काळजी घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - पती आणि पत्नी यांच्यातील नात्यामध्ये विश्वास असणे अत्यंत गरजेचे असते. जर विश्वासाचा हा धागा कधी तुटला तर दोघांचेही जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर असते. अनेकदा अशा गोष्टींसाठी संशय कारणीभूत असल्याचे समोर येत असते. पण संशय का निर्माण होतो हे तुम्हाला माहिती आहे का. पती अनेकदा पत्नीवर संशय घेत असतो, पण तो अचानक संशय घेऊ लागत नाही. तर काही लहान लहान कारणांमुळे संशयाला सुरुवात होते आणि संशय येण्यासाठी पूरक गोष्टी पत्नीने अधिक केल्या तर संशय वाढत जातो. संशयाला कारणीभूत ठरणाऱ्या या नेमक्या कोणत्या गोष्टी असतात हेच आपण जाणून घेणार आहोत. 


1. पती पत्नीमधील संवादाचा अभाव 
पती आणि पत्नी एकमेकांशी फार बोलत नसतील तर ही समस्या उद्भवू शकते. त्यातही पत्नी पतीबरोबर कमी बोलत असेल आणि इतरांशी अधिक बोलत असेल तर हा संशय बळावतो. पुरुषही अनेकदा अनेक गोष्टी मनातच ठेवत असतो. मोकळेपणाने ते कोणाशीही बोलत नाहीत. त्यामुळे पत्नीही संशय घेत असते. त्यामुळे दोघांनी एकमेकांशी मोकळेपणाने आणि स्पष्ट बोलणे अधिक चांगले. 
 

2. मोबाईलवर अधिक वेळ घालवणे 
जर पत्नी पतीपेक्षा मोबाईलला अधिक वेळ देत असेल तेव्हाही पतीचा संशय वाढीस लागतो. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. 

 

3. मेकअपची सवय  
सामान्यपणे प्रत्येक महिलेलाच मेकअप करण्याची आवड असते. पण कधी कधी याचा अतिरेक झाल्यामुळे पतीच्या मनामध्ये संशय निर्माण होत असतो. तसे पाहता पतीने पत्नीच्या या सवयीबाबत अधिक विचार करणे हेही संशयाचे कारण असते. 

 

4. इतर पुरुषांशी मोकळेपणाने बोलणे 
अनेकदा आपली पत्नी इतर पुरुषांबरोबर मोकळेपणाने किंवा हसून बोलत आहे हे पतीला सहन होत नाही. त्यामुळे त्याच्या मनात संशय निर्माण होत असतो. पण मग त्यामुळे पत्नीने असे करूच नये का.. असे नसून उलट पतीने याकडे संशयाच्या नजरेने न पाहणे हे अधिक उपयुक्त ठरू शकते. 
 
5. पतीला न सांगता मित्रांना भेटणे 
पतीच्या अनुपस्थितीत पत्नी बाहेर मित्रांना भेटण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी जात असेल तर त्यामुळेही पतीच्या मनात संशय निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो एकमेकांना आपल्या कामाबाबत किंवा आपण काय करणार आहोत हे माहिती असणे अधिक चांगले ठरते. 

बातम्या आणखी आहेत...