आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Recent Cut In Corporate Tax Rate Was Done To Boost Investments Says Chief Economic Adviser KV Subramanian

गुंतवणूक वाढवण्यासाठी कर कपात : मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नुकतीच करण्यात आलेल्या कंपनी करातील कपातीचा उद्देश गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा होता,असे मत मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले आहे. सुब्रमण्यम यांनी सोमवारी फिक्कीच्या 'यंग लीडर्स' परिषदेत सांगितले की, आर्थिक वृद्धीसाठी खासगी गुंतवणूक सर्वात महत्त्वाची आहे. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. सरकार जे कोणते पाऊल उचलू इच्छिते, मग ते कंपनी करातील कपात असो की वेतन व औद्योगिक संबंधावर संहिता, त्यांचा हेतू गुंतवणुकीसाठी जास्त अनुकूल वातावरण बनवणे आहे. त्यांनी सांगितले की, निरंतर आर्थिक वृद्धीसाठी गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. उपायांच्या अंमलबजावणीसाठी अजेंडा तयार केला असल्याचे, सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबरमध्ये कंपनी करात कपात केली

सरकारने आर्थिक हालचाली वाढवण्यासाठी आणि गंुतवणूक आकर्षित करण्यासाठी सप्टेंबरमध्ये कंपनी कराचा दर ३० वरून २२% केला होता. याशिवाय देश विदेशातून गुंतवणूक यावी यासाठी नव्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी कर दर १५% केला.

बातम्या आणखी आहेत...