आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आणि राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या' चे पहिले गाणे 'द वखरा' रविवारी संध्याकाळी रिलीज केले गेले. यादरम्यान तेव्हा वादग्रस्त परिस्थिती बनली होती, जेव्हा कंगना मीडियासोबत बातचीत करत होती. प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये जस्टिन राव नावाच्या एका पत्रकाराने जसे आपले नाव सांगितले, कंगना रनोट त्याच्यावर भडकली. सुमारे साडे सहा मिनिटे ती त्या पत्रकारासोबत भांडत होती. कंगनाच्या वर्तनाची खूप निंदा केली जात आहे आणि मीडिया तिच्याकडे माफी मागण्याची मागणी करत आहे. पण कंगनाची बहीण रंगोली चंदेलने ट्विटरवर मीडियाबद्दल खूप गोष्टी लिहिल्या आहेत आणि म्हणाली की, कंगना कधीही माफी मागणार नाही.
रंगोलीच्या निशाण्यावर आता मीडियाही...
रंगोलीने ट्विटरवर लिहिले, ' एका गोष्टीचे वचन देते, कंगना माफी तर मागणारच नाही, या विकाऊ, नंगे, देशद्रोही, देशाच्या दलाल मीडियावाल्यांना, पण ती तुम्हाला धुवून धुवून सरळ नक्कीच करेल. पाहात राहा तुम्ही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे माफीची मागणी केली आहे.'
Ek baat ka main vaada karti hoon, Kangana se apology toh nahin milegi, in bikau, nange, deshdrohi, desh ke dalal, libtard mediawalon ko, magar woh tumko dho dho kar sidha zaroor karegi ... just wait and watch, tumne galat insaan se maafi mangi hai ... 🙏 pic.twitter.com/gm8UvupO3S
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 9, 2019
काय आहे वादाचे कारण ?
कंगना म्हणाली, "जस्टिन तू तर आमचा शत्रू बनला आहे यार. खूप वाईट गोष्टी लिहीत आहेस. किती जास्त घाणेरड्या गोष्टी लिहीत आहेस. इतका घाणेरडा विचार कसा करतो." झाले असे की, कंगनाने आरोप केला होता की, जस्टिन तिच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टी लिहीत आहे आणि तुकाने 'मणिकर्णिका'च्या रिलीजदरम्यानही चित्रपटाबद्दल वाईट लिहिले होते. जेव्हा पत्रकाराने तिला मध्येच टोकले आणि म्हणाला की, त्याच्यावर असे आरोप करणे उचित नाही तर कंगना म्हणाली, "पण मग तुझ्यासाठी असे करणे उचित आहे का ?" कंगना पुढे म्हणाली, "तू म्हणालास कि मी जिंगोस्टिक महिला आहे, जिने मणिकर्णिका बनवला आहे. राष्ट्रवादावर चित्रपट बनवून मी काही चूक केली का ?"
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.