आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

32 हजार जागांची मेगाभरती, ऑनलाइन अर्जाची संधी; एसटी, कृषी, बांधकाम विभाग, रेल्वे, महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये जागा उपलब्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र शासनातर्फे ७२ हजार जागांची मेेगाभरती केली जाणार असून याचाच एक भाग म्हणून कृषीसेवक, परिवहन महामंडळ (एसटी), सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे, महापालिका व जिल्हा परिषद यांमध्ये एकूण ३२ हजार जागांच्या भरतीसाठी जाहीरीताही प्रसिद्ध झाल्या आहे. या सर्व जागांसाठी सोमवार दि. ७ ते २५ जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. मेगा भरतीची संपूर्ण प्रक्रिया व परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत राबवली जाणार आहे. 

 

राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या या मेगा भरतीच्या निमित्ताने नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना माेठा दिलासा मिळाला असून ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जागा भरल्या जाणार असल्याने युवकांना या संधीचा फायदा होणार आहे. www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. 

राज्य शासनाच्या या संकेतस्थळावर मेगा भरतीबाबतच्या जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या असून मेगाभरतीची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी २०० रुपये शुल्क असणार आहे. तसेच खुल्या प्रवर्गासाठीची वयोमर्यादा १८ ते ३८ व मागास प्रवर्गासाठी १८ ते ४५ एवढे निश्चित करण्यात आले आहे. 

 

संधीचा फायदा घ्यावा 
मेगाभरतीसाठी तयारी करताना परीक्षार्थींनी इंग्रजी, मराठी, भाषा, सा. ज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी या घटकांवर विशेष लक्ष द्यावे. बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करावा. ऑनलाइन परीक्षा असल्याने संगणकाची माहिती करून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे हेल्पडेस्क (८८०६३८८८२२) सुरु करण्यात आले असून ते सर्वांसाठी विनामूल्य असेल. - प्रा. राहुल शिंदे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
 
अशी होईल मेगाभरती 
कृषिसेवक (१४१६), राज्य परिवहन महामंडळ (४८३३), कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (४०५), भारतीय रेल्वे (१४०३३), महापालिका व जि. प. (१२०००) यांसह सोलापूर महापालिकेच्या ४५ जागांसाठीही जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून इच्छुक उमेदवारांना ७ ते २५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.