आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 1.25 कोटी रुपयांचे लाल वाळुतील अतिदुर्मिळ मांडूळ जप्त, मध्यप्रदेश पोलिसांचा कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे मांडूळ औषधी, सौंदर्यप्रसादने आणि काळ्या जादुसाठी वापरले जातात
  • आंतरराष्ट्रीय बाजारात या मांडूळाची मोठी मागणी असते

राजगड- मध्यप्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 जणांना अटक केले. त्यांच्याकडून तब्बल 1.25 कोटी रुपये किमतीचे लाल मातीमधील मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. हे 5 जण मध्यप्रदेशात मांडूळ विकण्यासाठी आले असता रविवारी सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी सांगितल्यानुसार, हे बिन विषारी मांडूळ औषधी, सौंदर्यप्रसादने आणि काळ्या जादुसाठी वापरले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात या मांडूळाची मोठी मागणी असते.

चांगले नशीब आणि पैसे कमवण्यासाठी मांडूळाचा उपयोग

पोलिसांनी सांगितले की, "आमच्या खबऱ्यांनी सांगितल्यानुसार तीन जण फोनवरुन मांडूळ विकण्याची चर्चा नर्सिंहगड बस स्थानकात करत होते. त्यानंतर खबऱ्यांनी तात्काळ आम्हाला माहिती दिली. तत्परता दाखवत पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि पवन नागर आणि शाम गुर्जर यांच्यासह इतर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याकडून एका प्लास्टीक बॅगमध्ये ठेवलेले मांडूळही जप्त करण्यात आले."

बातम्या आणखी आहेत...