आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Redmi K20 आणि Redmi K20 Pro विक्री सुरु , येथे आहे उपलब्ध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - शाओमीने नुकतेच लॉन्च केलेले Redmi K20 आणि Redmi K20 Pro ची विक्री सुरु झाली आहे. सोमवारपासून कंपनीची वेबसाइट mi.com आणि ई-कॉमर्स कंपनी flipkart वर दुपारी 12 वाजता या फोनची खरेदी करता येणार आहे. 


रेडमी के20 प्रोचे 6जीबी/128 जीबी व्हेरिएंट 27,999 रुपयांत मिळेल. तर 8जीबी/258जीबी व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. तर रेडमी के 20 चा 64 जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट 21,999 रुपयांत तर 128 जीबी स्टोरेज असणारे व्हेरिएंट 23,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. 


हे दोन्हीही फोन 6.39 इंच फुल एचडीप्लस एमोलेड डिस्प्लेसोबत येतील. यांमध्ये आस्पेक्ट रेशिओ 19:5:9 आहे. रेडमी के20 प्रो स्नॅपड्रॅगल 855 एसओसीवर काम करते. तर रेडमी के20 मध्ये स्नॅपड्रॅगन 730 एसओसी चिपसेट आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अनुक्रमे 8 जीबी आणि 6 जीबी रॅम देण्यात आली आहे. 


या दोन्ही फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे आणि अॅड्राईड 9 पायवर आधारित मीयू 10 वर काम करते. दोन्हीमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा पॉपअप कॅमेरा आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...