आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्याओमीने 129 दिवसांत केली तब्बल 1 कोटी हँडसेटची विक्री, दररोज 77520 ग्राहकांनी खरेदी केले फोन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- श्याओमी कंपनीने आपल्या लोकप्रिय आणि बजेट स्मार्टफोन रेडमी नोट-7 सीरीजचे जगभरात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी हँडसेट विक्री केली आहे. कंपनीचे को-फाउंडर ली जून यांनी सांगितले की, हा गौरव प्राप्त करण्यासाठी आम्हाला फक्त 129 दिवस लागले. या हिशोबाने, कंपनीने दररोज 77,520 हँडसेटची विक्री केली. एवढे मोठे यश मिळाल्यामुळे कंपनीने केक कापून आनंद साजरा केला. या दरम्यान श्याओमीचे सब-ब्रांड रेडमीची संपूर्ण टिम उपस्थित होती.


कमी किंमतीत उत्कृष्ट हँडसेट 
भारतात रेडमी नोट-7 सीरीजची सुरूवातीला 9,999 रुपये किंमत होती. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हॅरिअंट या मॉडलची आहे. तसेच, याच्या अपग्रेड सीरीज नोट-7 प्रो, किंमत 13,999 रुपये आहे. जो 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हॅरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

 

मॉडल                      व्हॅरिएंट                     किंमत
रेडमी नोट 73GB+32GB9,999 रुपये   
4GB+64GB11,999 रुपये 
रेडमी नोट 7 प्रो4GB+64GB13,999 रुपये 
6GB+128GB16,999 रुपये 

 

रेडमी नोट 7 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले      6.3-इंच FHD+, रेझोल्यूशन (2340x1080 पिक्सल)          
प्रोसेसर 2.2 GHz क्वालकॉम स्नैपड्रैगन 660 AIE ऑक्टा-कोर
रॅम3GB आणि 4GB
स्टोरेज32GB आणि 64GB, 256GB microSD सपोर्ट
कॅमरा12+2MP रिअर, 13MP फ्रंट
बॅटरी4000mAh

 

 

रेडमी नोट 7 प्रो का स्पेसिफिकेशन

डिस्प्ले       6.3-इंच FHD+, रेझोल्यूशन (2340x1080 पिक्सल)
प्रोसेसर 2.0 GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोर
रॅम4GB आणि 6GB
स्टोरेज64GB आणि 128GB
कॅमरा48+5MP रिअर, 13MP फ्रंट
बॅटरी4000mAh

 

 

 

बातम्या आणखी आहेत...