आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रेडमीचे 10000 आणि 20000 mAh कॅपेसिटी असलेल्या दोन पावरबँक लॉन्च, 5 वेळेस चार्ज होईल तुमचा फोन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- श्याओमीने रेडमी ब्रँडच्या पिल्या पॉवरबँक चीनमध्ये लॉन्च केल्या आहेत. यात 10,000 एमएएच आणि 20,000 एमएएच बॅटरी कॅपेसिटी असलेल्या दोन पॉवरबंक सामिल आहेत. चीनमध्ये याची किंमत 1000 रुपयांपर्यंत आहे. चीनमध्ये याची विक्री 23 जुलैपासून सुरू होईल. या पॉवर बँक फक्त पांढऱ्या रंगातच उपलब्ध आहेत. लवकरच या भारतीय बाजारात उपलब्ध होतील.

 

> 10,000 एमएएच कॅपेसिटी असलेल्या पावरबंकमध्ये दोन आउटपुट यूएसबी पोर्टामध्ये टाइप-ए पोर्टचे ऑप्शन मिळेल. दोन्ही पोर्टमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा नाहीये. यात 5V आणि 2.1A चे दोन इनपुट पोर्ट आहेत ज्यात, पहिला मायक्रो यूएसबी आणि दुसरा यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. 


> 20,000 एमएएच कॅपेसिटी असलेल्या पॉवरबँकमध्येही दोन पोर्ट आहेत, पण याचे चार्जिंग फंक्शन वेगळे आहेत. यात 5V आणि 2A, 9V आणि 2.1A, आणि 12V आणि 1.5A इनपुट रेटिंग वाले फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हे 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, याच्या मदतीने रेडमी नोट 7 (4000 mAh) ला 3.5 वेळेस, एमआय 9 (3300 mAh) ला 5.3 वेळेस, रेडमी के20 (4000 mAh) ला 3.5 वेळेस आणि आयफोन एक्सएस (2658 mAh) 4.8 वेळेस चार्ज केले जाऊ शकते.

0