आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या ठिकाणी महिलांमध्ये राग येण्याचे प्रमाण कमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरांमध्ये कामाच्या ठिकाणी ताणतणावाचे प्रसंग नित्याचे असले तरी, याबाबतीत राग व्यक्त करण्याचे आणि जाणूनबुजून चुका करण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे. बॉसने शुक्रवारी कामासाठी थांबवून घेतल्यास ५७ % पुरुषांचा रागाने भडका उडतो, तर या बाबतीत महिलांचे प्रमाण ५२ % आहे.  तसेच वाहतुक कोंडीमुळे कामावर जाण्यास उशिर होत असेल तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी राग येतो असे एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षात समोर आले आहे.


 
शहरामध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या एकूण ताण तणाव आणि चिडचिडेपणा यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचारी अधिक समंजसपणे परिस्थिती हाताळतात, असे दिसून आले आहे. टाटा सॉल्ट लाइटने देशातील प्रमुख महानगरांमध्ये  केलेल्या ‘एज ऑफ रेज’ (संतापाचे प्रमाण या अर्थाने)   या सर्वेक्षणात सदर निष्कर्ष समोर आला आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांमधील पाचपैकी एका महिलेच्या दृष्टीने (२०%) कामाशी संबंधित समस्या हे संतापाचे मुख्य कारण असले तरी  अनपेक्षित काम पाहिल्यावर संतापाने लाल होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे.  वाहतूक कोंडीमुळे कामाला जायला उशीर झाला तर ५७ % पुरुषांचा संयम सुटून वाहतूक पोलिसांशी किंवा अन्य चालकांशी भांडण होते, तर या तुलनेत महिलांचे प्रमाण ५५%  आहे.या सर्वेक्षणानुसार, पुरुष अनेक वेळा ‘टेक रेज’चे बळी ठरतात. आपला फोन चार्ज करण्यासाठी लावलेला असताना न विचारता कोणी फोनची पिन काढली तर आपण आक्रमक होतो आणि खूप राग येतो, अशी कबुली सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पुरुषांपैकी ६४% पुरुषांनी दिली. या बाबतीत महिलांचे प्रमाण ६१% आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ६९% पुरुष व ६५% स्त्रिया यांची चीडचीड होते आणि वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट या सेवा अचानक बंद पडल्या तर सर्व्हिस प्रोव्हायडरशी वादविवाद होतात. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले पुरुष व स्त्रिया यांच्यामध्ये अशाच प्रकारची वैशिष्ट्ये आढळून आली असून, ६६% पुरुष व ६४ % महिला यांना दिवसातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने राग येतो. ‘एज ऑफ रेज’चा परिणाम इतरांवरही होतो. ३५% महिलांच्या तुलनेत ४३ % पुरुष ऑफिसमधील सहकाऱ्यांवर किंवा बाहेरील व्यक्तींवर राग काढतात,असे सर्वेक्षणात दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.संतुलन आहे आवश्यक

सध्याच्या काळात महिला विविध प्रकारच्या भूमिका बजावतात. . आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने शिक्षणाच्या व कामाच्या बाबतीत, कमालीची स्पर्धा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती व सोशल मीडिया यामुळे ते अधिकाधिक उतावळे ते अति-उतावळे बनत आहेत. कमतरता किंवा अति-खाण्याने शारीरिक ताण वाढत असल्याने आरोग्यपूर्ण व पुरेसा आहार घेऊन संतुलन साधणे आवश्यक अाहे. 
 डॉ. राजेश पाधी, क्रिटिकल-इंटर्नल स्पेशलिस्टबातम्या आणखी आहेत...