आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतियाळा (पंजाब) - 10 वीच्या विद्यार्थीनीला कोणीतरी फोन करून जीवे मारण्यची धमकी देत आहे. अद्यापही हा कॉलर पोलिसांच्या हाती लागला नाही. तर दुसरीकडे मुलीचे कुटूंब भीतीच्या वातारवणात रात्री काढत आहे, मंगळवारी फोन करणाऱ्या माथेफिरूने मुलीच्या घरात काचा फेकल्या होत्या. यानंतर मुलीच्या नावाने चिठ्ठी लिहीली होती. त्यामध्ये 'जस्सी रघवारा आय लव्ह यू. तू घाबरली आहेस ना' अशी विचारपूस केली होती. या प्रकरणामुळे मुलीचे 15 दिवसांपासून शाळेत जाणे बंद झाले आहे.
रील सारखी रिअल कहाणी - या घटनेला तीन चित्रपटांच्या उदाहणांसह समजून घेऊ शकता
सीन - 1 चित्रपट डर..... घाबरवून घरात बंद राहण्यास भाग पाडले
> आरोपीने सर्वात आधी घरी फोन करण्यास सुरूवात केली. ज्या नंबरवरून कॉल केला तो नंबरही मुलीच्याच वडिलांच्या नावावर रजिस्टर्ड होता. त्यानंतर मुलीला साहिबा नावाने संबोधित करण्यास सुरूवात केली. मग काचा फेकणे, रिकाम्या बाटल्या फेकणे आणि अॅसिड फेकण्याची धमकी देत भीतीदायक वातारण तयार करणे असे कारन तो काहीही करू शकतो असे दाखवण्यासाठी गर्दीमध्ये मुलीचा हातही पकडला होता.
सीन-2 चित्रपट डॉन... पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन
> आरोपीने शाहरुख खानचे डॉन चित्रपटील संवाद पाठ केले होते. स्वत:ला डॉन सिद्ध करण्यासाठी पोलीस तक्रारीनंतरही कुटूंबीयांना धमकी दिली. म्हणाला की, शेवटी गेलेच ना पोलिसांकडे, पोलिस मला काय करतील. मुझे पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन भी है।
सीन-3 मिर्जा.. कोणतीही भीती नाही. थेट घरात करतोय प्रवेश
> परिवाराने घरावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. पण आरोपीने मात्र मिर्जाच्या कॅरेक्टरप्रमाणे साहस दाखवत घराच्या छतावर जाण्यास सुरूवात केली. मंगळवारी तर त्याने घरात काचा देखील फेकल्या होत्या आणि पायऱ्यांनी वर येऊन खोलीच्या दरवाजावर मार्करने 'साहिबा आय लव्ह यू' लिहीले होते.
पोलिसांना जाग येईल का?......
> या पूर्ण प्रकरणात पोलिस देखील हिंदी चित्रपटांप्रमाणे शेवटच्या सीनची वाट पाहत आहे. कदाचित एखाद्या अविपरीत घटनेनंतर त्यांची येण्याची इच्छा असेल.
परिवाराने बंद केला घराचा जीना
> घर रस्त्यावर असून पहिल्या मजल्यावर आहे. रस्त्यावरून शिडी वरच्या मजल्यावर येते. हल्लेखोराने काही हल्ले रस्त्यावर उभे राहून केले. परिसरातील सर्व घरे एकमेकांना जोडलेले असल्यामुळे घरापर्यंत पोहोचणे अवघड नाहीये. यामुळे आरोपीने सहजतेने छतावरून काचेच्या बाटल्या फेकल्या होत्या. आरोपी दुसऱ्या मजल्यावरून पायऱ्यांनी खाली आला आणि खालील खोलीच्या दरवाज्यावर धमक्या लिहून निघून गेला. यामुळे भयभीत झालेल्या परिवाराने पायऱ्यांवर लाकडं आणि खुर्ची टाकून जीना बंद केला आहे. खालील मेन गेट देखील कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे.
स्मार्टगिरी - सीसीटीव्हीचा फोकस गेटवर केला तर हल्ला करण्याची दिशा बदलली
> पीडितेच्या घरासमोरील शोरूममधील सीसीटीव्हीची दिशा पीडितेच्या घराच्या गेटवर केली आहे. पण हल्लेखोराने कॅमेराची दिशा पाहून घेतली. आरोपीने सोमवारी सीसीटीव्हीच्या कक्षेत न येणाऱ्या भागावरून हल्ला केला होता. त्यामुळे त्याविरुद्ध पुरावा भेटला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.