आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reference Taken From Games Of Thrones In 'Tanhaji' : The Unsung Warrior' Said Saif Ali Khan

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये 'गेम्स ऑफ थ्रोन्स'मधून घेतला संदर्भ - सैफ अली खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सैफ अली खान 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये उदयभान राठौडच्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. त्याची तुलना सोशल मीडियावर यूजर्सने 'गेम्स ऑफ थ्रोन्स'मधील पात्र जॉन स्नो याच्याशी केली होती. कारण दोघांचा पोज सारखाच होता, शिवाय दोघांच्या लूकमध्ये बरेच साम्य आहे. आता यावर सैफने आपली प्रतिक्रिया दिली.

सैफ म्हणाला..., 'हो, हे खरं आहे, या चित्रपटात 'गेम्स ऑफ थ्रोन्स' मधून काही संदर्भ घेण्यात आला आहे. पोशाख आणि चित्रपटाचा सेट बनवण्यासाठी निर्मात्यांनी काही वस्तू हॉलीवूडशी मिळत्या-जुळत्या घेतल्या आहेत. मात्र उदयभानचे पात्र मी आयुष्यात कधीच साकारले नाही. त्याच्यासाठी एका अनुभव कलाकाराची गरज होती.'
 

बातम्या आणखी आहेत...