आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Refrigerator Compressor Blast In Gwalior Kills 5 Of A Family

घरातील Fridge ने एका झटक्यात संपवले अख्खे कुटुंब; वाचला फक्त एक भाऊ, असा झाला Blast

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - येथील एका घरात फ्रिजच्या कंप्रेसरचा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की शेजारील घराची छत कोसळली. त्याच छताच्या ढिगाऱ्याखाली दबून परिहार कुटुंबाच्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये अंतराम सिंह परिहार (50), त्यांची पत्नी उमा (45), मुलगा जयसिंह, तसेच दोन बॉक्सिंग चॅम्पियन मुली खुशी (14) आणि कशिश (11) यांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यामध्ये पलंगावर झोपल्याने फक्त एक 17 वर्षांचा मुलगा जिवंत वाचला आहे. कारण छत तिरपे कोसळले आणि तो थेट त्याखाली येण्यापासून बालंबाल बचावला. 


असा झाला ब्लास्ट
लष्करातून निवृत्त असलेला सैनिक चरण सिंहच्या बंद घात शनिवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या आगीत घरातील कपडे आणि फर्निचर भस्मसात झाले. त्यांचाच आसरा घेत आग किचनपर्यंत पोहोचली. किचनमध्ये असलेली प्लास्टिकचे गॅस पाइप जळाले आणि गॅस गळती सुरू झाली. याच गॅसमुळे आगीचा झपाट्याने फैलाव झाला आणि आग फ्रिजपर्यंत पोहोचली. यातच फ्रिजच्या कंप्रेसरचा मोठा ब्लास्ट झाला. स्फोट इतका भीषण होता की किचनची भिंत पडून शेजारी अंतरामच्या घरावर आदळळी आणि त्याच्या घराचे अख्खे छत कोसळले. ही माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या बॉम्ब डिस्पोझल आणि बचाव पथकाने दिली आहे. 


मुलींनी दोन महिन्यांपूर्वीच जिंकला होता गोल्ड
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलींनी नुकतेच जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सब जुनिअर कॅटेगरीमध्ये गोल्ड जिंकले होते. या स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी केले जाणार होते. परंतु, दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दोघींनी गेल्या वर्षी सुद्धा बॉक्सिंगमध्ये सिलव्हर आणि ब्राँझ जिंकले होते. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना पाठवले जाणार होते.