आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- लक्ष्मी नारायणनगरात गुरुवारी पूलावरून पाण्यात पडून एक युवक वाहून गेला अाहे. शुक्रवारी महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व महसूलच्या आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाल्याच्या शहरातून जाणारा सर्व भागाचा शाेध घेतला; पण ताे सापडलेला नाही. दरम्यान, गमबूट नसल्याने एमअायडीसी पाेलिसांनी युवकाचा शाेध घेण्यासाठी नाल्यात उतरण्यास नकार दिल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
लक्ष्मी नारायणनगराकडे अयाेध्यानगरातून जाण्यासाठी असलेल्या नाल्यावर इतरांना मदत करणाऱ्या वेल्डिंग काम करणारा कामगार हेमंत वाणी हा नाल्यात ताेल जाऊन गुरुवारी दुपारी ३.३० वाजता वाहून गेला अाहे. त्याचा शुक्रवारी रात्रीपर्यंत शाेध लागलेला नाही. गुरुवारी दुपारी ४.३० वाजेपासून त्यांच्या शाेध घेण्यात येत अाहे. मनपाच्या अापत्ती व्यवस्थापन दलाच्या नऊ जण शाेध घेत अाहेत. गुरुवारी या दलाने घटनास्थळ ते याेगेश्वरनगर, विद्या काॅलनी, खेडीतील शाैचालय व परत विद्यानगरातून वाहणाऱ्या नाल्यात न उतरताच शाेध घेतला. शुक्रवारी मात्र थेट नाल्यात उतरून गाळात अडकलेला अाहे का याचा शाेध घेतला.सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अश्वजित घरडे, गंगाधर काेळी, राेहिदास चाैधरी, वसंत काेळी व वाहनचालक देविदास सुरवाडे या टीमने गाैरव हाॅटेल ते खेडीच्या पुलापर्यंत नाल्यात उतरून पायी चालून तपास कार्य सुरु केले. दुपारी जेवणानंतर दुसऱ्या टीमने शोध कार्य सुरु केले. यात खेडी पुलापासून पुढे थेट असाेदा रेल्वेगेट येथील पाच माेरी पुलापर्यंत अश्वजित घरडे, साेपान जाधव, शशिकांत बारी, साेपान काेल्हे व वाहनचालक प्रदीप धनगर या पथकाने शाेध घेतला. या ठिकाणी सुमारे चार किलाेमीटर या पथकाने पाच फुट उंच झुडप असलेल्या भागात उतरून शाेध कार्य केले; मात्र तेथेही काही अाढळले नाही. संध्याकाळी ६.७५ वाजता शाेध मोहीम अंधारामुळे थांबविण्यात अाली. दाेन्ही दिवस तहसीलदार अमाेल निकम हे शोध कार्याच्या ठिकाणी शाेध पथकासाेबत थांबून हाेते.
केमिकलमुळे शाेधकर्त्यांना त्रास
अापत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून शाेध कार्य सुरु असतांना नाल्यात केमिकल कंपन्यांनी साेडलेल्या वेस्ट केमिकलमुळे नाल्यात शाेध घेणाऱ्यांच्या डाेळ्यात जळजळणे, अंगाला खाज येणे अादी त्रास हाेत हाेता. त्यामुळे शोध कार्यात अडथळे येत हाेते. तरी देखील पथकाने अापले काम सुरूच ठेवले हाेते.
नागरिकांनी व्यक्त केला संताप
महापालिकेच्या अापत्ती व्यवस्थापन पथकाप्रमाणेच पाेलिस दलानेही बेपत्ता युवकाचा शाेध घेणे अपेक्षित असतांना एमअायडीसी पाेलिसांनी पाण्या उतरण्यासाठी गमबूट नसल्याने शाेध घेण्यास नकार दिल्याची माहिती लक्ष्मी नारायण नगरातील नागरिकांना मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.