आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार; दोन तरुणींना दिली धमकी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती - महाविद्यालयीन तरुणीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबु नारायण अलोकर रा. रजनीकुंड ता. चिखलदरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महाविद्यालयीन तरुणी १९ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयासमोरून जात असताना आरोपी बाबू अलोकर दुचाकीवर आला. त्याने पीडितेला दुचाकीवर बसवून एका रुमवर नेले. तेथे त्याने तरुणीसोबत काढलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल केले. यासोबतच बाबुने तरुणीला संबंध ठेवण्याबाबत धमकीही दिली. दरम्यान, तरुणीने ही घटना वडिलांना सांिगतल्यास जीवे मारण्याची धमकीही देऊन रुममधील संभाषणही रेकॉर्ड केले. यामुळे घाबरलेल्या तरुणीने रविवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बाबू अलोकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

प्रेमसंबंध तोडल्याने दिली तरुणीला मारण्याची धमकी 


अमरावती | प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतापलेल्या युवकाने तरुणीला जीव मारण्याची धमकी दिल्याची घटना गाडगेनगर शेगाव येथे उघडकीस आली असून याप्रकरणी दिनेश मधुकर खोब्रागडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आऱोपी दिनेशचे मागील पाच वर्षांपासून पीडित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु दिनेशची वागणूक चांगली नसल्यामुळे पीडितेने त्याच्यासोबत संबंध तोडले होते. बोलणेही बंद केल्यामुळे संतापलेला दिनेश वारंवार पीडितेला फोन करून त्रास देत होता. यातच फोनवरून तु आता फिटली, तुला मी मारून टाकणार अशी धमकी देऊन शिवीगाळही केली. दरम्यान, तरुणीने रविवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून दिनेश खोब्रागडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

बातम्या आणखी आहेत...