आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाराबाबत राज्यातील महापौर असमाधानी,परिषदेत मागण्या मुख्यमंत्र्यांकडे सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -राज्यातील महापौर त्यांना असलेल्या अधिकारांबाबत समाधानी नाहीत. शहराचा प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना जादा प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळावेत. पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावांवर निश्चित कालावधीत निर्णय व्हावेत, अशा मागण्या नागपुरातील महापौर परिषदेत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिकांचे उत्पन्न वाढवण्याचा सल्ला दिला. 


आयएएस अधिकारी स्वतःलाच हुशार समजतात : आयएएस अधिकारी स्वतःलाच हुशार समजतात आणि ते आहेतच. पण लोकप्रतिनिधीनाही व्यावहारिक ज्ञान असतेच हे लक्षात घ्यावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आपसात भांडल्यास शहरांचा विकास होणार नाही. त्यामुळे या दोन्ही घटकांनी विकासात आपली भूमिका समजून घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
 

महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी नागपुरात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिषदेस अध्यक्ष व बृहन्मुंबई महापालिकेचे महापौर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर, उपाध्यक्षा नंदा जिचकार यांच्यासह राज्यातील महापौर उपस्थित होते. 


अधिकाराचा गैरवापर केल्यास जेलमध्ये जावे लागते : गडकरी
अधिकारांचा गैरवापर केल्यास जेलमध्ये जावे लागते, असा टोमणा मारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिषदेत वाद ओढवून घेतला. महापाैरांचे  अधिकार वाढावेत याच्याशी आपण सहमत असल्याचे सांगून यामुळे द. कोरियाच्या ३ पीएमना जेलमध्ये जावे लागल्याचा दाखला गडकरींनी दिला.

बातम्या आणखी आहेत...