आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुमत सिद्ध करण्याबाबत फडणवीस, अजित पवारांची रात्री ‘वर्षा’वर खलबते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह काही भाजप नेत्यांत रविवारी मध्यरात्री ‘वर्षा’ बंगल्यावर खलबते झाली. सुरुवातीला अजितदादांसाेबत बंड करणारे बहुतांश आमदार सध्या शरद पवारांकडे परतले आहेत. या पार्श्वभूमीवर साेमवारी काेर्टाने तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यास काय रणनीती असेल, याबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर मात्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे टि‌्वटद्वारे सांगितले. दरम्यान, शरद पवार व उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेऊन बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा केला.  तसेच दगाफटका टाळण्यासाठी सेना, राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना दुसऱ्या हाॅटेलमध्ये हलवले.