आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Regarding The Role Of Ranveer's Wife Onscreen, Deepika Said 'Feeling Emotionally Comfortable ..'

ऑनस्क्रीन रणवीरच्या पत्नीचा रोल साकारण्याबद्दल दीपिका म्हणाली - 'भावनात्मकरित्या खूप हलके आणि सहज वाटत आहे..' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मागच्यावर्षी लग्नाच्या बंधनात बांधले गेले. स्टार कपल रिअल लाइफनंतर रील लाइफमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित चित्रपट '83' मध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे तर दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया देव यांच्या रोलमध्ये आहे. ऑनस्क्रीन रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारण्याबद्दल दीपिका म्हणाली, 'भावनात्मकरित्या खूप हलके आणि सहज वाटत आहे.'

 

लग्नानंतर पहिल्यांदा करत आहेत एकत्र चित्रपट... 
तसे तर रणवीर आणि दीपिकाने यापूर्वीही एकत्र काम केले आहे. पण लग्नानंतर हा त्यांचा एकत्र पहिलाच चित्रपट असेल. आपल्या भूमिकेबद्दल दीपिकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले आहे, 'मला अशा भूमिका करण्यात फार मजा येते. ज्या माझ्यातून खूप काही काढून घेतात. 83 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीम आणि कर्णधार कपिल देव यांच्यावर खूप प्रेशर होते. अशात त्यांची पत्नीदेखील तेच प्रेशर अनुभवत होती. पण आपल्या पतीचे प्रेशर आणि टेंशन दूर ठेवण्यासाठी त्यांची मदत करते. अशात रोमी यांनी वर्ल्ड कपदरम्यान महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दोघांनीही यादरम्यान हलक्या फुलक्या क्षणांसोबत प्रेशर आणि टेंशनवर नियंत्रण मिळवले. मलादेखील रणवीरसोबत काम करताना हेच जाणवत आहे. त्याच्यासोबत भावनात्मकरित्या खूप हलके फुलके आणि सहज वाटत आहे.'

 

दीपिकाने अशातच मेघना गुलजारचा चित्रपट 'छपाक' चे शूटिंग संपवले आहे. या चित्रपटात ती असिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणारव आहे. हा चित्रपट खूप सीरियस आणि भावुक करणारा असणार आहे. दीपिका म्हणते, 'छपाक एक खूपच इमोशनल चित्रपट आहे. या चित्रपटानंतर पती रणवीरच्या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप चांगले होते. मला त्याच्यासोबत काम करताना नेहमीच खूप छान वाटते.' 

 

दीपिकाचा चित्रपट 'छपाक' चे पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या सुरु आहे. तसेच यावेळी ती रणवीरसोबत लंडनमध्ये '83' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहेत. 'छपाक' मार्चमध्ये रिलीज होणार आहे तर '83' एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.