आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्टून कॅरेक्टर मिनी माउसला आवाज देणाऱ्या रेजी टेलर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी झाले निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : फेमस कॅरेक्टर मिनी माउसला आवाज देणाऱ्या रेजी टेलरक यांचे शुक्रवारी कॅलिफोर्नियाच्या ग्लानडेल येथे निधन झाले होते. 'द वॉल्ट डिस्नी' कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डिस्नी बॉब इगरने ही बातमी सांगितली. आपल्या वक्तव्यात ते म्हणाले, 'मिनी माउसने रेजी टेलर यांच्या निधनासोबत आपला आवाज गमावला.' 

 

इगरने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, '30 वर्षांपासून मिनी आणि रेजीने जगभरातील लाखो लोकांच्या मनोरंजयासाठी एकत्र काम केले. एक भागीदारी ज्याने मिनीला एक ग्लोबल आयकॉन बनवले आणि रेजीला जगभरातील प्रशंसकांमध्ये डिस्नी लीजेंड बनवले.'

 

 

लहानपणापासून होत्या डिस्नीच्या फॅन... 
टेलर यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये मिनीला आवाज दिला होता. ज्यामध्ये टीव्ही, थीम पार्क अनुभव, अॅनिमेटेड शॉर्ट्स आणि थिएटरचे काही चित्रपट सामील आहेत. मिनीला आवाज देण्याआधीपासून म्हणजेच लहानपणापासून त्या डिस्नीच्या खूप मोठ्या फॅन होत्या. टेलर यांनी दिवंगत अभिनेते वेन ऑल्विन यांच्यासोबत लग्न केले होते, ज्यांनी मिकी माउसला आवाज दिला होता.