आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदामाचे तेल नियमित वापरा, त्वचा, केसांचे आरोग्य वाढवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदाम एक ड्रायफूट नसून याचा वापर सौंदर्य जतन आणि वाढवण्यासाठीही केला जातो. बदामात एक नव्हे तर अनेक गुणांची खाण आहे. यात व्हिटॅमिन ई आणि ड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स आढळतात. जे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. बदामामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त खजिना आहे. अनेक लोक बदामाच्या तेलाला बदाम रोगन तेल असेही म्हणतात. या तेलाचा वापर लोक आवडीने करतात कारण यात अनेक गुण आहेत. खरं तर, बदाम रोगन हे तांत्रिक उपकरणांचा वापर करून बदामातून काढले जाते. यामुळे या तेलातील गुणवत्ता वाढते. त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे बदामाचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत.

हेल्दी स्कीनसाठी : बदामाच्या तेलाचे अगणित फायदे आहेत. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि ग्लोसाठी बदाम हे फारच उपयुक्त आहे. हे त्वचेला पोषण देते, त्यामुळे त्वचा जास्त मुलायम होते. हे मॉइश्चरला त्वचेमध्ये लॉक करते आणि पोर्सही ब्लॉक होऊ देत नाही.

त्वचा उजळण्यासाठी : बदाम रोगनमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला फारच उपयुक्त आहे. त्वचा काळवंडली असेल आणि त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर रोज चेहऱ्यावर बदाम रोगन तेलने मालीश करा. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढेल.

डार्क सर्कल कमी करण्यासाठी : रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या खाली या तेलाने हलकी मालीश केल्यास खूप फायदा होतो. रोज या तेलाचा वापर केल्याने डार्क सर्कल्स निश्चितच कमी होतात.

अँटी- एजिंग : या तेलातील अँटी एजिंग इफेक्टचा फायदा सर्वात जास्त आहे. या तेलाचा वापर रोज केल्यास त्वचा फ्रेश आणि तारुण्यमय राहते. यात असलेल्या व्हिटॅमिन आणि फॅटी अॅसिड्समध्ये एजिंग रिव्हर्स करण्याची आणि स्कीन सेल्सला नावीन्य देण्यासाठी सहायक आहे.

टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी : बदाम तेलाचे फायदे अनेक आहेत पण सगळ्यात चांगला गुण असा की, हे तेल नॅचरल सनस्क्रीन म्हणूनही काम करतं. हे त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही वाचवतं. तसंच सूर्याच्या किरणांचा वाईट परिणामही दूर करतं.

डाग-विरहित त्वचेसाठी : बदाम तेलाचा वापर करण्याने तारुण्यपिटिकांची समस्या दूर होते आणि तुम्हाला मिळते डागविरहित त्वचा. हा एक वापरलेला आणि अनुभवलेला फॉर्म्युला आहे. हे त्वचेला खाजेपासूनही सुटका देतं आणि स्कीनला रिलॅक्स करतं.

कोरडेपणा दूर करण्यासाठी : जर त्वचा कोरडी, निर्जीव आणि खरखरीत झाली असेल तर बदाम रोगनने चेहऱ्यावर चांगला मसाज करा. हे स्कीनचे ड्रायनेस घालवते आणि त्वचेला मुलायम बनवते. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये बदाम रोगन त्वचेसाठी अगदी औषधांप्रमाणे काम करते.

मेकअप रिमूव्हर म्हणून वापरा बदाम रोगन तेल : चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे हे तेल, कारण हे फारच हलके आणि कमी चिकट असते. हे पोर्स चांगल्या रीतीने उघडते आणि मेकअपच्या सगळ्या खुणा दूर करते. बदाम तेल हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.

बातम्या आणखी आहेत...