आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित असल्याचे लपवून भामट्याने तरूणीवर केला बलात्कार, कोर्टाने जामीन फेटाळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विवाहित असल्याचे लपवून तरूणीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. अमोल रामदास गायकवाड (वय 30, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत हिंजवडी भागात राहणाऱ्या 29 वर्षीय तरूणीने तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 29 सप्टेंबर ते 13 डिसेंबर 2018 या कालावधीत तळेगाव येथे घडली.

 

अमोल याचे लग्न झाले आहे. तरीही लग्नाचे अमिष दाखवून त्याने फिर्यादींवर बलात्कार केला. घरातील अडचणी सांगून तिच्याकडून वेळोवेळी 90 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याच्याकडे असलेले फोटो फेसबुक आणि व्हाट्‌सअपवर टाकण्याची धमकी देत 10 लाख रुपये देण्याची मागणी फिर्यादींकडे अमोल आणि त्याची पत्नी सोनाली हिने केली. फिर्यादीस मारहाण केली. सोनाली हिच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अमोल याला पोलिसांनी अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्‍यता आहे, यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद अॅड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने अमोल याचा जामीन फेटाळला.

बातम्या आणखी आहेत...