आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बिग बींच्या दीर्घायुष्यासाठी रेखाने अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाला घातले होते साकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी आज वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे झाला. रेखा आणि महानायक यांची लव्ह स्टोरी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र 'कुली' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान बिग बींना घायाळ झालेले बघून संपूर्ण देशासोबतच रेखासुद्धा खूप खचल्या होत्या. बिग बींच्या दीर्घायुष्यासाठी रेखा यांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाला साकडे घातले होते. रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा सांगत आहे...

 

1982 साली मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते. रुग्णालयात शेकडो लोक दररोज अमिताभ यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी येत असायचे. याकाळात पत्नी जया बच्चन त्यांची देखभाल करत होत्या. शिवाय अभिषेक आणि श्वेता ही त्यांची मुले खूप लहान होती. या संघर्षाच्या काळात जया बच्चन मोठ्या हिंमतीने सर्वकाळी सांभाळत होत्या. 
त्याचकाळात रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मात्र रेखा अमिताभ यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हत्या. त्याचे कारण बिग बींच्या पत्नी जया होत्या.

 

वादाला तोंड फुटू नये, अशी होती रेखा यांची इच्छा... 

रेखा बिग बींच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी धडपडत होत्या, मात्र जया यांच्यामुळे त्यांना रुग्णालयात जाणे शक्य नव्हते. या कठीण काळात आपल्यामुळे वादाला तोंड फुटू नये, अशी रेखा यांची इच्छा होती. याचा परिणाम बिग बींच्या तब्येतीवर होईल, हे त्यांना ठाऊक होते. 

एकेदिवशी मोठ्या हिंमतीने रेखा यांनी जया यांच्या अनुपस्थितीत सकाळच्या वेळेत रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते, की या काळात रेखा अमिताभ यांच्या स्वास्थासाठी कठीण पूजापाठ करत होत्या. एकेदिवशी सकाळच्या वेळेत रेखा त्यांनी त्यांचे जवळचे मित्र शरद पांडे यांच्यासोबच ब्रीच कँडी रुग्णालय गाठले.

 

बिग बींची भेट झाली, मात्र त्यांची अवस्था बघून खचल्या... 
रेखा यांची बिग बींना बघण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र तेथील दृश्य बघून त्या खचून गेल्या. त्यांचे प्रियकर इंटेसिव केअर युनिट (ICU) मध्ये होते.  बेशुद्धावस्थेत पडलेले अमिताभ, शरीरावर वेगवेगळ्या नळ्या, श्वसन यंत्र,, शेजारी औषधांचा ढीग हे बघून रेखा यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. रेखा यांच्याकडे आपल्या प्रियकराच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. 


महाकालीपासून ते तिरुपती बालाजीचे घेतले दर्शन...
याकाळात रेखा यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन एक लाख 25 हजारांचा जप केला. त्यांनतर तिरुपतीला जाऊन अमिताभ यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे साकडे घातले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना हे सर्व समजल्यानंतर ते हैराण झाले होते. त्यांनी म्हटले होते, की जर रेखा यांनी ही गोष्ट त्यांना सांगितली असती, तर त्यांनी जया यांची समजूत घालून त्यांच्याकडून रेखा यांना रुग्णालयात येण्याची परवानगी मिळवली असती. मात्र रेखा यांनी प्रकाश मेहरांना काहीही न सांगता प्रयत्न करत होत्या. 

 

बिग बींच्या मनात निर्माण झाली रेखाविषयी कटुता... 
बातम्यांनुसार, याकाळात कुणीतरी जया बच्चन यांचे कान भरले होते, की अमिताभ मृत्यूशी झुंज देत असताना रेखा पार्ट्यांमध्ये बिझी आहे. पुढे बिग बींना हे कळल्यानंतर त्यांच्या मनात रेखा यांच्याविषयी कटुता निर्माण झाली. शिवाय संजय दत्त-रेखा यांच्या अफेअरच्या खोट्या बातम्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. अमिताभ यांना सांगण्यात आले होते, की संजय दत्त आणि रेखा यांचे अफेअर सुरु आहे. इतकेच नाही तर रेखा यांनी आमंत्रण देऊनसुद्धा अमिताभ 'उमराव जान' या सिनेमाच्या पार्टीत सहभागी झाले नव्हते. 


काळ्या काचा असलेल्या गाडीतून रेखा बघायच्या अमिताभची झलक... 
प्रकृती सुधारल्यानंतर बिग बी आपल्या प्रतीक्षा बंगल्यातून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करायचे. असे म्हटले जाते, की रेखा काळ्या काचा असेलल्या गाडीतून दुरूनच अमिताभ यांची एक झलक बघायच्या. ही गोष्ट कधीही अमिताभ यांना समजू शकली नव्हती. असेही म्हटले जाते, की बिग बींची तब्येत सुधारायला लागल्यानंतर एकेदिवशी रेखा शशी कपूर यांच्यासह रुग्णालयात त्यांना भेटायला पोहोचल्या होत्या. मात्र त्यावेळी अमिताभ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. 


असो, रेखा यांनी अमिताभ यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, कधी तरी त्यांना प्रतीक्षातून बोलावणे येईल, याचीही वाट बघितली. मात्र अमिताभ यांच्या मनात त्यांच्याविषयी एवढी कटुता निर्माण झाली की, त्यांनी कधी त्यांची साधी विचारपूससुद्धा केली नाही.   

बातम्या आणखी आहेत...