आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाचा बर्थडे : विनोद मेहरांसोबत लग्न करुन सासरी पोहोचली होती रेखा, सासूने स्वागत करण्याऐवजी केली होती शिवीगाळ, मारण्यासाठी काढली होती चप्पल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा 10 ऑक्टोबर रोजी वयाची 64 वर्षे पूर्ण करणार आहे. 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास येथे तिचा चन्म झाला. रेखाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. तिच्या ऑटोबायोग्राफीमध्ये खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. यामध्ये विनोद मेहरांसोबत लग्नानंतर करण्यात आलेले चपलेने स्वागत... हा किस्सा आहे. 

 

रेखाच्या सासूने केली होती शिवीगाळ... 
- यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या 'रेखा : अनटोल्ड स्टोरी' या ऑटोबायोग्राफीत याविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. रेखाचे विनोद मेहरांसोबत लग्न झाले होते. कोलकातामध्ये लग्न झाल्यानंतर रेखा विनोद मेहरांसोबत त्यांच्या घरी आली, तर विनोद यांच्या मातोश्री कमला मेहरा यांनी रागाच्या भरात रेखावर चप्पल उगारली होती. 

- रेखा कमला मेहरा यांच्या पाया पडायला गेली असता, त्यांनी तिला धक्का दिला आणि घराबाहेर जाण्यास सांगितले. रेखा घराच्या दारातच उभी होती. त्यावेळी तिच्या सासूबाई कमला मेहरांनी तिला शिवीगाळ केली. - विनोद मेहरा यांनी मध्यस्थी करत आपल्या आईची समजूत घातली. भांडणामुळे रेखा दुःखी झाली. ती रडत लिफ्टच्या दिशने गेली. विनोद यांनी रेखाला तिच्या घरी परत जाण्यास सांगितले आणि ते मात्र स्वतः आपल्या आईसोबतच राहिले.

 

झाली होती दुःखाची जाणीव...
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरचे किस्से बरेच गाजले आहेत. जयांच्या सांगण्यावरुन अमिताभ यांनी रेखासोबत काम करणे बंद केले होते. रेखाच्या ऑटोबायोग्राफीत 1978 मधील तिच्या एका चर्चित मुलाखतीचा उल्लेख आढळतो. या मुलाखतीत रेखाला कशाप्रकारे  जयाच्या दुःखाची जाणीव झाली होती, हे तिने सांगितले होते. मुलाखतीत रेखाने सांगितले होते, 'मी एकदा संपूर्ण बच्चन कुटुंबीयांना एकत्र पाहिले होते. ते 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटाच्या ट्रायल शोसाठी प्रोजेक्शन रुममध्ये आले होते. जया समोरच्या रांगेत बसल्या होत्या, तर अमिताभ यांचे आईवडील दुस-या रांगेत बसले होते. मी लांबून जया यांना स्पष्ट बघू शकत होते. आमचे (अमिताभ बच्चन आणि रेखा) 'लव्ह सीन' बघताना जया यांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर जया यांनी निर्मात्यांना स्पष्ट सांगितले होते की, 'ते' (अमिताभ बच्चन) रेखासोबत कधीच पुन्हा काम करणार नाहीत.' 

 

भांगात कुंकू लावून पोहोचली होती रेखा 
उस्मान यांनी रेखाच्या ऑटोबायोग्राफीत आणखी एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी लिहिले, - 22 जानेवारी, 1980 रोजी ऋषी कपूर आणि नीतू यांचे लग्न झाले होते. नीतू यांनी त्यांची जवळची मैत्रीण असलेल्या रेखाला लग्नाता आमंत्रित केले होते. लग्नानंतर झालेल्या पार्टीत अमिताभ बच्चन दिग्दर्शक मनमोहन देसाईंसोबत एका कोप-यात उभे राहून गप्पा मारत होते, तर जया त्यांच्या सासूबाई तेजी बच्चनसोबत बसल्या होत्या. याचवेळी रेखा व्हाइट कलरची साडी, गळ्यात मंगळसूत्र, माथ्यावर लाल टिकली आणि भांगात कुंकू लावून तिथे दाखल झाली. रेखाला बघून सगळेच अचंबित झाले होते.

- फोटोग्राफर्सचे लक्ष रेखाकडे होते. तर रेखा फक्त अमिताभ यांना बघत होती. दोघांमध्ये पाच मिनिटे बोलणेही झाले होते. जया यांनी काही वेळ स्वतःला सावरले मात्र नंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते.

- दरम्यान रेखाने पुन्हा लग्न केले का? असा प्रश्न पार्टीत उपस्थित सगळ्यांना पडला होता. काही दिवसांनी रेखाने खुलासा केला होता की, ती एका चित्रपटाच्या सेटवर या गेटअपमध्ये होती आणि शूटिंग सेटवरुन त्याच गेटअपमध्ये ती पार्टीत पोहोचली होती.

- तसं पाहता, रेखा कायम भांगात कुंकू लावत असते. याविषयी एका मुलाखतीत रेखाला विचारले असता, तिने हसून याचे उत्तर दिले आणि ती म्हणाली होती, 'माझ्या शहरात कुंकू लावणे ही एक फॅशन आहे.' 

बातम्या आणखी आहेत...