आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखा बर्थडे: ज्या वयात मुलं शाळेत जातात त्या वयापासून करावे लागले काम, रंग आणि लठ्ठपणामुळे उडायची खिल्ली, एक इच्छा आजही अपूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री रेखा आज (बुधवार) आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे झाला. रेखाला तिच्या आयुष्यात अनेक दुःख सहन करावी लागली आहेत. तिची कधीच अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती. पण नाईलाजाने तिला चित्रपटांत काम करावे लागले. तामिळसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये रेखाने स्वतःची वेगळी छाप उमटवली. रेखा जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा सावळा रंग आणि लठ्ठपणामुळे तिची अनेकदा खिल्ली उडवली होती. पण रेखाने कधीही हार मानली नाही. स्वबळावर तिने चित्रपटसृष्टीत नाव कमावले. रेखाची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली. 


वयाच्या 13 व्या वर्षापासून करावे लागले चित्रपटांत काम... 
- ज्या वयात मुले शाळेत जातात, मित्रमैत्रिणींसोबत खेळतात, त्या वयात रेखाने कॅमेरा फेस केला होता. रेखाने एका मुलाखतीत सांगितले होते, 'मला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण घरातील परिस्थितीमुळे मला नाईलाजाने या क्षेत्रात यावे लागले.' 

- रेखाने तामिळ इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात केली आणि नंतर ती हिंदी सिनेसृष्टीत आली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला अनेक कष्ट घ्यावे लागले. त्यावेळी तिचा रंग सावळा होता आणि ती लठ्ठ होती. पण पुढे जाऊन तिने स्वतःत आमुलाग्र बदल घडवला. भाषेपासून रंगापर्यंत, रेखाने स्वतःला ग्रुम केले. 

 

रेखाला हवे होते स्वतःचे कुटुंब...
संघर्षातून यशोशिखरावर पोहोचलेल्या रेखाच्या आयुष्यात कायम एक उणीव राहिली. मुलाखतीत ती म्हणाली होती, 'मला अभिनेत्री व्हायचे नव्हते. लग्न करुन संसार थाटायचा होता. पती आणि मुले हवी होती.' 

- रेखाच्या आयुष्यात अनेक लोक आले. पण एकाही व्यक्तीसोबत तिचे नाते टिकले नाही. 

 

वडिलांसोबत कधीही होऊ शकले नाही घनिष्ठ नाते...
रेखाने तिच्या वडिलांना बघितले, पण कधीही त्यांचा सहवास तिला हवा तसा मिळाला नाही. जेमिनी गणेशन हे तिच्या वडिलांचे नाव होते. एका चॅट शोमध्ये रेखाने तिच्या वडिलांविषयी म्हटले होते, मी त्यांना बघितले, पण कधीही त्यांच्या जवळ जाऊ शकली नाही. जेव्हा लोक फादर म्हणायचे, तेव्हा मला सर्वप्रथम चर्चमधील फादर आठवायचे. मला त्यांची खूप आठवण येते, असे मी म्हणणार नाही, कारण त्यांच्यासोबतचे नाते कधीच मजबुत नव्हते.

 

या हिट चित्रपटांमध्ये केले रेखाने काम...
रेखाने 'सावन भादो', 'गोरा और काला', 'धर्मा', 'नमक हराम', 'दो अनजाने', 'खून पसीना', 'घर', 'मुकद्दर का सिकंदर', 'मि. नटरवरलाल', 'सुहाग', 'खूबसूरत', 'उमराव जान', 'सिलसिला', 'खून भरी मांग'सह अनेक हिट चित्रपटांत अभिनय केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...