आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड सेरेमनीमध्ये 70 वर्षांच्या कोरियोग्राफरला भेटल्यानंतर त्यांच्या पायाजवळ बसून बोलत राहिल्या रेखा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. मुंबईमध्ये रविवारी रात्री मराठी तारका अवॉर्ड्स झाले. या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री उपस्थित होत्या. 64 वर्षांच्या रेखा यांनीही येथे उपस्थिती दर्शवली. यादरम्यान त्यांची भेट त्यांच्या आवडत्या कोरियोग्राफर सरोज खान यांच्यासोबत झाली. 70 वर्षांच्या कोरियोग्राफरचा सन्मान करत रेखा त्यांच्या पायाशी बसल्या आणि त्याच्यासोबत बोलू लागल्या. सरोज खान यांनी 'सुपरनानी'मध्ये रेखा यांना कोरियोग्राफ केले होते. 

 

रेखा यांनी घेतली कंगना रनोटची गळाभेट 
- इव्हेंटदरम्यान रेखा आणि कंगना रनोट यांची जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली. तिने रेखा यांची गळाभेट घेतली आणि खुप वेळ हातात हात घेऊन गप्पा मारत राहिली. रेखा यांनी यादरम्यान कंगनाची बहीण रंगोलीलासुध्दा जवळ घेतले. रेखा सर्वांसमोर कंगनाची स्तुती करत म्हणाल्या की, जर माझी एखादी मुलगी असती, तर ती हुबेहूब कंगनासारखी असती. सेरेमनीमध्ये कंगनाने जी ब्लॅक कलरची साडी नेसली होती, ती रेखा यांनी तिला गिफ्ट केली होती. 

 

जेव्हा रेखा यांनी घरी जाऊन कंगनाला दिला होता अवॉर्ड 
- रेखा आणि कंगना यांची बॉन्डिंग नेहमीच जबरदस्त असते. जेव्हा कंगनाने 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'साठी फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड जिंकला होता, तेव्हा त्या सेरेमनीमध्ये सहभागी होऊ शकल्या नव्हत्या, तेव्हा रेखा यांनी त्यांना घरी जाऊन ट्रॉफी दिली होती. वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर कंगना सध्या 'मणिकर्णिका'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 


 

 

बातम्या आणखी आहेत...