आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Fifty Plus Actresses Stunning Looks In Deepika Ranveer Reception: Rekha Jaya Bachchan To Hema Malini Madhuri Dixit Looks More Than Gorgeous To Other Actresses In Deepveer Party

रेखा, जया आणि हेमापासून ते वहिदा रहमानपर्यंत : रणवीर-दीपिकाच्या पार्टीत आजच्या अभिनेत्रींवर वरचढ ठरल्या वयाची पन्नाशी ओलांडलेल्या या 10 हिरोइन्स : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या  शनिवारी झालेल्या मुंबईतील रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. अलीकडेच सिनेसृष्टीत डेब्यू करणारी जान्हवी कपूर आणि डेब्यूसाठी सज्ज झालेल्या सारा अली खान यांनी उपस्थिती लावली होती.  याशिवाय करीना कपूर, ऐश्‍वर्या राय, रवीना टंडन, करिश्‍मा कपूर, जॅकलीन फर्नांडिस पार्टीत पोहोचल्या होत्या. इतकेच नाही तर वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अभिनेत्री रेखा, हेमा मालिनी, माधुरी दीक्ष‍ित, जूही चावलासह अनेक अभिनेत्री यावेळी आजच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त स्टनिंग लूकमध्ये दिसल्या. रिसेप्शनमध्ये या अभिनेत्रींनी एकाहून एक आकर्षक आउटफिट्स कॅरी केले होते. या अभिनेत्री स्टाइलमध्ये आजच्या अभिनेत्रींना मात देताना दिसल्या. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचा यावेळी जलवा दिसला. तर वयाची साठी ओळांडलेल्या रेखा आणि सत्तरी पार केलेल्या हेमा मालिनीसमोर सर्वजणी फिक्या दिसल्या. रिसेप्शनमध्ये रेखा सिल्क साडीत तर हेमा मल्टीकलर साडीत दिसल्या. तर दुसरीकडे माधुरीने लाइट सिल्व्हर कलरची नेट साडी कॅरी केली होती. तर जुही ब्लू कलरच्या गाऊनमध्ये सुंदर दिसली. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात, वयाची पन्नाशी ओलांडलेल्या दहा अभिनेत्रींवर ज्या वयाच्या या टप्प्यावर आजच्या काळातील अभिनेत्रींवर वरचढ ठरल्या.

 

1. रेखा
रेखा (64) यांनी 1970 मध्ये आलेल्या 'सावन भादो' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यांनी 'गोरा और काला' (1971), 'रामपुर का लक्ष्मण' (1972), 'कीमत' (1972), 'कहानी किस्मत की' (1972), 'नमक हराम' (1973), 'दो अंजाने' (1976), 'एक ही रास्ता' (1977), 'घर' (1978), 'सुहाग' (1979), 'राम बलराम' (1979) सह अनेक चित्रपटांत काम केले आहे.


2. जया बच्चन 
जय (70) यांनी 1971 मध्ये आलेल्या 'गुड्डी'द्वारे डेब्यू केला होता. 'उपहार' (1971), 'कोरा कागज' (1974), 'जंजीर' (1973), 'अभिमान' (1973), 'चुपके चुपके' (1975), 'मिली' (1975), 'शोले' (1975) सह अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावी आहेत. त्या अखेरच्या 2016 मध्ये आलेल्या 'की अँड का' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी कॅमिओ केला होता.


3. माधुरी दीक्षित
माधुरी (51) ने 'अबोध', 'तेजाब', 'राम लखन', 'परिन्दा', 'त्रिदेव', 'किशन- कन्हैया', 'प्रहार', 'दिल'सह अनेक हिट चित्रपटांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणू घ्या आणखी अशा 7 अभिनेत्रींविषयी ज्यांनी दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये लाइमलाइट एकवटली.... 

बातम्या आणखी आहेत...