आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः अभिनेत्री मनीषा कोइरालाने 16 ऑगस्ट रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अभिनेत्री रेखा मनिषाचे कौडकौतुक करताना दिसल्या. पार्टीत रेखा त्यांची सेक्रेटरी फरजानासोबत पोहोचल्या. येथे आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मनिषाच्या आई सुषमा कोइराला यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर बर्थडे गर्ल मनीषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फुलांचा हार घातला.
पार्टीत पोहोचून शाहरुखने दिले मनीषाला सरप्राइज...
- मनीषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता शाहरुख खानसुद्धा पार्टीत पोहोचला होता. पार्टीत अचानक एन्ट्री घेऊन त्याने मनीषाला सरप्राइज दिले. त्यानंतर मनीषासोबत त्याने केक कापला आणि सर्व फ्रेंड्ससोबत एन्जॉय केले.
- मनीषा कोइराला आणि शाहरुख खानने केवळ दोनच चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या 'गुड्डू' आणि 'दिल से' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
- मनीषाचा जेव्हा 'डियर माया' हा कमबॅक चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा एका मुलाखतीत ती शाहरुखविषयी म्हणाली होती, "शाहरुखमध्ये भरपूर एनर्जी आहे. त्याच्यासोबत काम करणे एक मोठी गोष्ट आहे. तो अतिशय केअरिंग आहे."
मान्यता दत्तसोबत पोहोचले हे सेलेब्स
- मनीषाच्या या ग्रॅण्ड बर्थडे पार्टीत संजय दत्तची पत्नी मान्यतासुद्धा सहभागी झाली होती. याशिवाय संजय लीला भन्साळी, मनीष मल्होत्रा, गोविंदाची पत्नी सुनीता, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवरसह अनेक सेलेब्स या पार्टीत दिसले.
- मनीषा कोइराला 2018 मध्ये राजकुमार हिराणींच्या 'संजू' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची तर मनीषाने नर्गिस दत्त
यांची भूमिका वठवली होती.
मनीषाने या चित्रपटांमध्ये केले काम...
- मनीषाने 'धनवान' (1993), 'मिलन' (1994), '1942 ए लव स्टोरी' (1994), 'बॉम्बे' (1995), 'अकेले हम अकेले तुम' (1995), 'अग्निसाक्षी' (1996), 'गुप्त' (1997), 'दिल से' (1998), 'मन' (1999), 'लज्जा' (2001) सह अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, मनीषाच्या बर्थडे पार्टीचे खास PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.