आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेतनेला आव्हानाशी जोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्यात एक चेतना असते. सहज सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपण मनुष्य आहोत ही भावना जेव्हा ठामपणे निर्माण झालेली असते, त्याला चेतना म्हणतात. आमची चेतना आशा आणि निराशेच्या दरम्यान लटकत असते. ज्या लोकांना आपले जीवन खरोखरच मस्तीत जगायची इच्छा आहे, त्यांच्यातील चेतनेला संघर्ष आणि आव्हानांशी जोडले पाहिजे. आत्मविश्वास हा चेतनेचा प्राण आहे. त्यामुळे आपल्यात इतका आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की, जीवनात जेव्हाही सामना कराल, समस्या मोठीच असली पाहिजे. मोठी आव्हाने आपल्या आतील चेतना जागृत करत असतात. आपल्याजवळील चेतनेला नेहमी मोठी उद्दिष्टे, संघर्ष आणि आव्हानांशी, परिस्थितीशी आणि निर्णयाशी जोडा. चेतनेचा विकास करण्यात याच गोष्टी उपयोगी पडतात. अशक्यकोटीतील आलेल्या मोठ्यात मोठ्या संकटाचा सामना करण्याची शक्ती आपल्यात अवश्य असते. जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीशी सामना करत असता, तेव्हा आपल्यातील चेतना आपणास पर्याय दाखवत असते. ती तुम्हाला भीती दाखवेल, सावध पावले उचलण्याची प्रेरणा देऊन आळशी बनवेल. अशा लोकांचे जीवन कठीण असते.