आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस बँकेतही उघडावे खाते !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर्सच्या स्वरूपात भाविकांना दान देता यावे, यासाठी तिरुपती संस्थानने डीमॅट खाते उघडल्याची बातमी ‘दिव्य मराठी’त वाचली. दान स्वरूपात दररोज कोट्यवधींची रक्कम जमा होऊनही सामाजिक बांधिलकीसाठी पुढाकार न घेणाऱ्या देवस्थानांनी स्वत:चे उत्पन्न वाढवण्याची आणखी एक तरतूद केल्याचे वाचून खेदच झाला. दुष्काळ, अतिरेकी हल्ले, सुनामी, भूकंप अशा एकाही संकटात देशातील मोठ्या देवस्थानांनी एका पैशाचीही मदत केल्याचे ऐकिवात नाही. अर्थात, यात काही अपवादही आहेत. अशा देवस्थानांनी आता स्विस बँकेतही खाते उघडावे.
बातम्या आणखी आहेत...