Home | National | Madhya Pradesh | relative forcibly physical relations with Women

पतीसोबत भांडण केल्यानंतर माहेरी जात होती पत्नी, वाटेत भेटलेल्या नातेवाईकावर विश्वास ठेऊन त्याच्यासोबत गेली महिला; आठवडाभर उद्धस्त करत होता तिचे आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 02:40 PM IST

आरोपीने आमिष दाखवून महिलेला आपल्या मावशीच्या घरी नेले होते

  • relative forcibly physical relations with Women


    भोपाळ (मध्य प्रदेश) - येथे महिलेवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपीने महिलेला आमिष दाखवून आपल्या मावशीच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेसोबत शारिरीक संबंध बनवले. घटनेच्या बऱ्याच दिवसांनंतर महिलेने पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


    आठवडाभर महिलेसोबत केली जबरदस्ती
    पोलिसांच्या मते, रायसेन येथील 30 वर्षीय महिलेचा काही दिवसांपासून पतीसोबत वाद होत होता. रोजच्या भांडणाला कंटाळून 28 मार्च रोजी आपल्या माहेरी जात होती. बसमध्ये प्रवास करत असताना अजीमची आणि तिची भेट झाली. अजीम तिचा नातेवाईक आहे. महिलेने अजीमला पतीसोबत झालेल्या वादाबद्दल सांगितले असता त्याने पतीसोबत चर्चा करून हे प्रकरण मिटविण्याचा विश्वास दिला. भोपाळला जाईपर्यंत संध्याकाळ झाली यामुळे अजीम महिलेला घेऊन आपल्या मावशीच्या घरी घेऊन गेला. महिलेने पोलिसांना सांगितले की, त्याच रात्री अजीमने तिच्यासोबत जबरदस्ती केली. ती एक आठवडाभर मावशीच्या घरी राहिली. या काळात अजीमने बऱ्याच वेळा तिचे शारिरीक शोषण केले. नंतर ती रायसेनला घरी परत आली आणि पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. शुक्रवारी त्यांनी पोलिसांत जाऊन आरोपिविरोधात तक्रार दाखल केली.

Trending