Maharashtra Crime / पुण्यात जमिनीच्या वादातून भर रस्त्यात महिलेवर वार करुन आरोपीने काढला पळ, नंतर पाठलाग करणाऱ्या नागरिकांवर केला गोळीबार

एका तरुणाने जीवाची पर्वा न करता आरोपीकडून बंदुक हिसकावली

प्रतिनिधी

Sep 04,2019 10:25:02 PM IST

पुणे- येथील महर्षी नगरमध्ये एका व्यक्तिने जमिनीच्या वादातून नात्यातल्या एका महिलेवर भर रस्त्यात वार करुन पळ काढला. त्यानंतर पळत असताना नागरिकांवर गोळीबार केला. यावेळी एका व्यक्तिने जीवाची पर्वा न करता त्याला पकडले.

पुण्यातील महर्षी नगरमध्ये एका व्यक्तिने जमिनीच्या वादातून नात्यातल्या एका महिलेवर भर रस्त्यात वार केले. त्यानंतर पळ काढत असताना रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. लोक पाठलाग करत असताना, त्याने आपल्याजवळील बंदुक काढून नागरिकांवर गोळीबार केला.

या दरम्यान, आलम शेख नावाचा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता गोळीबार करणाऱ्या तरुणावर धावून गेला आणि त्याचा हातातील बंदुक घेऊन त्याला पकडले. त्यानंतर सर्व नागरिकांनी आरोपीला त्याच्या बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.


महर्षी नगर येथे आरोपीला पकडल्यावर पोलिस चौकशी करत असतानाच आरोपीचे चुलत भाऊ सराफ तेथे आल्यावर पोलिसांनसमोरच आरोपीने चुलत भावाला तुम्हाला सगळ्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

X
COMMENT