आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Release Date Extended By Seven Months In US And UK| Film Will Hit Theaters In November

यूएस आणि यूकेमध्ये सात महिने पुढे ढकलली रिलीज डेट, आता नोव्हेंबर महिन्यात थिएटरमध्ये दाखल होणार चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  जेम्स बाँड सीरिजचा 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. हा चित्रपट भारतात 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चित्रपटाची तारीख सात महिने पुढे ढकलली आहे. आताच्या घोषणेनंतर हा चित्रपट यूकेमध्ये 12 नोव्हेंबर आणि जगभरात 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


काेरोनामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती आहे. कोरोनामुळे चीनचे सर्व चित्रपटगृह जानेवारीपासून बंद आहेत. याशिवाय जपान, साऊथ कोरिया आणि इटलीमधील काही भागातील चित्रपटगृहेदेखील बंद आहेत. 


चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी आपल्या टि्वटर अकाउंटवरून याची घोषणा केली होती. त्यांनी लिहिले, खूप विचार केल्यानंतर आणि ग्लोबल इंटरनॅशनल मार्केटनुसार आम्ही निर्णय घेतला आहे की, ‘नो टाइम टू डाय’ नोव्हेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलली आहे.’

14 वर्षांपासून एजंट 007ची भूमिका साकारत आहे डेनियल


या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा 51 वर्षीय डॅनियल क्रेग सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारा बाँड अभिनेता ठरला आहे. 2005 पासून त्याने 4 जेम्स बाँड चित्रपट केले आहेत. आगामी ‘नो टाइम टू डाई’ हा त्याचा पाचवा बाँडपट आहे. 

बातम्या आणखी आहेत...