आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग : लक्ष्मीबाई बनून कंगनाने केले स्पेशल फोटोशूट, पुढे जाऊ शकते 'मणिकर्णिका' ची रिलीज डेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनलेला कंगना रनोटचा चित्रपट 'मणिकर्णिका' 25 जानेवारी 2019 ला रिलीज होणार आहे. मात्र याचदिवशी नवाजुद्दीन स्टारर बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक 'ठाकरे'सुद्धा रिलीज होणार आहे. 'मणिकर्णिका' साठी 'ठाकरे' मोठा रोडब्लॉक ठरू शकते. यामुळेच 'मणिकर्णिका' चे मेकर्स रिलीज डेट पुढे सरकावण्याचा विचार करत आहेत. याचदरम्यान कंगनाने लक्ष्मीबाईच्या रूपात एक स्पेशल फोटाेशूट करून घेतले आहे.  

 

होऊ शकते नुकसान... 
शिवसेना फिल्म 'ठाकरे' ला रिलीज करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्हीतही असणार आहे. 'मणिकर्णिका' चे मेकर्स या सर्वांचा विचार करत आहेत आणि जर हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले तर 'मणिकर्णिका' ला हवे तेवढे यश मिळणार नाही. त्यामुळे कंगनाच्या चित्रपटाला नुकसान होऊ शकते. 'ठाकरे' या चित्रपटासोबत 'मणिकर्णिका' रिलीज झाल्यास पहिल्या आठवड्यात स्क्रिन मिळणे अशक्य आहे.  

 

शिवसेनेचा आहे सपोर्ट...  
महाराष्ट्रात 'ठाकरे' ला जास्तीत जास्त स्क्रीन मिळणार. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंशी भवनात्मक पद्धतीने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना वाटते की, या चित्रपटाला सोलो रिलीज मिळावा. दुसरीकडे 'मणिकर्णिका' चे मेकर्सही या चित्रपटाला ग्रैंड लेवलवर रिलीज करू इच्छितात कारण खूप मोठ्या लेव्हलवर हा चित्रपट बनवला गेला आहे. शिवसेनेच्या सपोर्टमुळे 'मणिकर्णिका' चे प्रोड्यूसरही वादापासून दूर राहू इच्छितात. 

 

हिट चित्रपटाची गरज आहे कंगनाला... 
मागच्यावर्षी अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' ने 'पद्मावत' ला रास्ता करून दिला होता आणि आता यावर्षी 'मणिकर्णिका' शिफ्ट होण्याची पूर्ण शक्यता आहे. ट्रेड एनालिस्टनुसार, कंगनाला आता एका हिट चित्रपटाची गरज आहे. त्यामुळे ती कोणत्याही वादात पडू इच्छित नाही. महाराष्ट्र खूप मोठे मार्केट आहे आणि कुणीही याचे नुकसान करून घेऊ इच्छिणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...