Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Release Notification of NMC ward structure

आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनपा प्रभागरचनेची अधिसूचना जारी

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 12:03 PM IST

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयुक्तांनी शासन राजपत्रात प्रारूप प्रभागरचना व आरक्षण शासनाच्य

 • Release Notification of NMC ward structure

  नगर- महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयुक्तांनी शासन राजपत्रात प्रारूप प्रभागरचना व आरक्षण शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केले. दोन दिवसांपूर्वी प्रभागाची व्याप्ती स्पष्ट झाली असली, तरी अधिसूचनेकडे लक्ष लागले होते. प्रभागाची रुपरेषा लक्षात आल्यानंतर नगरसेवकांसह इच्छुकांची धावपळ उडाली आहे.


  आगामी निवडणूक १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी होणार असून चार नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी आरक्षणाची सोडत जाहीर केली. ९ जागा अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, तर १८ जागा नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव आहेत. ६८ नगरसेवकांपैकी ३४ जागांवर महिला उमेदवार असतील. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर प्रभागातील व्याप्तीबरोबरच उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम दिशेनुसार समाविष्ट भागाची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.


  अधिसूचनेनंतर प्रारुप प्रभागाचे चित्र स्पष्ट झाले असून आता हरकती दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दिग्गजांचे बालेकिल्ले असलेले प्रभाग इतर प्रभागांत समाविष्ट झाल्याने काहींची दमछाक झाली आहे. नगर शहरात सध्या प्रभागरचनेचीच चर्चा असून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.


  नगरसेविका ढवण यांनी घेतली हरकत
  महावीर पोखर्णा यांनी दोन हरकती दाखल केल्या आहेत. मंगळवारी नगरसेविका शारदा ढवण यांनीही हरकत दाखल केली. प्रभाग एक मध्ये सिद्धी विनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, उज्वल सोसायटी, ऑक्झिलीयम शाळा, गणेश कॉलनी, प्रिन्स कॉलनी या भागांचा समावेश करण्याचे ढवण यांनी सुचवले आहे. तसेच चंद्रकांत शेळके यांनी म्हाडा वसाहतीतील मतदारांचा समावेश एकाच प्रभागाच्या यादीत करण्याचे सुचवले आहे.

Trending