आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Released Song From 'Panipat' Movie, 'Mard Maratha' Was Shot For 13 Days With 1300 Dancers.

'पानिपत' चित्रपटातील गाणे रिलीज, 1300 डान्सर्ससोबत 13 दिवस शूट झाले होते 'मर्द मराठा' गाणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे...' हे गाणे आशुतोश गोवारीकरच्या 'पानिपत' चित्रपटातील आहे. ते मंगळवारी रिलीज झाले. युद्धावर आधारित या चित्रपटातील हे गाणे मोठ्या प्रमाणात चित्रीत करण्यात आले आहे. आशुतोषच्या आधीच्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटदेखील भव्य असणार आहे. यात राजेशाही थाटाचा भव्य डौलारा दाखवण्यात येणार आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी.... 

मराठा साम्राज्याची भव्यता दिसते... 
या गाण्यात मराठा साम्राज्याची भव्यता दिसते. त्या काळातील पारंपरिक उत्सव कशा प्रकारे साजरा केला जात होता, तो यात टिपण्यात आला आहे. आशूसरने हे गाणे शूट केले. त्या काळातील लोक कसे राहायचे, त्यांची भव्यता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कुठे झाले चित्रीत : करजतच्या एनडी स्टुडिओमध्ये शनिवार वाड्याचा भव्य सेट बनवून.

कोणावर चित्रीत केले : अर्जुन कपूर, कृती सेनन, मोहनीश बहल आणि पद्मिनी कोल्हापुरेसारखे कलाकार.

किती दिवसात चित्रीत झाले : १३ दिवस चालले याचे शूटिंग.

गाण्याचे वैशिष्ट्ये : 
- हे गाणे पेशव्याच्या काळातील वेशभूषा आणि दाग-दागिन्यांवर आधारित आहे. 
- यात एक मोठी भव्य गणपतीची मूर्तीदेखील दिसते. 
- गाण्यात १३०० डान्सर्स आहेत. त्यात पुण्यातील लेझीम आणि बूल डान्सर्सचा सहभाग आहे.

कोरियाेग्राफर : राजू खान

सेट डिझायनर : आर्ट डायरेक्टर नितीन देसाई

साँग कंपोजर : हिंदी आणि मराठीचे शब्द असलेले हे गाणे अजय-अतुलने कंपोज केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...