आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी ब्रिटिश कंपनीसोबत मिळून उघडणार 2000 पेट्रोल पंप, आपणही मिळवू शकता Dealership, अशी आहे Process

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - ब्रिटिश पेट्रोलियम आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड एकत्रित येऊन भारतात 2000 नवीन पेट्रोल पंप उघडणार आहेत. हे पेट्रोल पंप येत्या 3 वर्षांत उघडले जातील. रिलायन्स सध्या स्वतःचे 1343 पेट्रोल पंप चालवत आहे. तर बीपी पीएलसीला 2016 मध्ये 3500 फ्यूल रिटेल आउटलेट्स उघडण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात इंधनाची मागणी आणि किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे, परदेशी कंपन्यांचा भारताकडे कल वाढत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रिलायन्सकडे देशात 5 हजार पेट्रोल पंप चालवण्याचा परवाना आहे.


आपणही होऊ शकता या पेट्रोल पंपाचे डीलर
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये काम करणारे अभिनव सिंह राजपूत यांनी प्रश्नोत्तराच्या साह्याने वेबसाइट कोरावर यासंदर्भातील माहिती दिली. या माध्यमातून काही अटींचे पालन करून आपणही पेट्रोल पंपाचे डीलर होऊ शकता. यासाठी किती खर्च येईल याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. यासाठी आपल्याकडे चांगली लोकेशन आणि भांडवल असणे आवश्यक आहे. डीलरला कंस्ट्रक्शनशी संबंधित सर्वच कामे जसे की ड्राइव्ह वे, बाउंड्री, केनोपी, सेल्स रूम बिल्डिंगचे बांधकाम करावे लागेल. तर आयटी, डिसपेन्सर आणि यूएसटी इंस्टॉल करण्याची कामे कंपनीकडून केली जाणार आहेत.


किती येणार खर्च?
पेट्रोल पंप उघडण्यासाठी 50 ते 75 लाख रुपये खर्च येऊ शकतो. यामध्ये जमीनीची किंमत समाविष्ट नाही. जवळपास 23 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागेल. हे अमाउंड रिफंडेबल असेल. 3.5 लाख रुपये सायनिंग अमाउंट म्हणून घेतले जाईल. रिलायन्सची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. प्रत्येक व्यवहार, स्टॉक आणि रिपोर्ट्स सुद्धा आपण ऑनलाइन चेक करू शकता.


असे करा अप्लाय...
- आपण रिलायन्ससोबत पार्टनरिशपमध्ये पेट्रोल पंप उघडू इच्छित असाल तर www.reliancepetroleum.com या वेबसाइटला भेट देऊन अप्लाय करू शकता.
- आपल्याला पार्टनर्सच्या ऑप्शनमध्ये जावे लागेल. येथे आय एम इंटरेस्टेडचा पर्याय निवडून तेथील फॉर्म भरावा लागेल.
- पार्टनर टाइपमध्ये पेट्रोल रिटेल आउटलेट डीलरशिपचा ऑप्शन दिसेल, तो आपल्याला सिलेक्ट करावा लागेल.
- हा फॉर्म भरल्यानंतर रिलायन्सची टीम आपल्याशी संपर्क साधेल. 

बातम्या आणखी आहेत...