आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio महाधमका ऑफर : 5 वर्षापर्यंत फ्री टीव्ही व्यतिरिक्त 20 रुपयात मिळेल 5G सिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एकामागे एक धमाके करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना फ्री इंटरनेटपासून ते फ्री टीव्ही पाहण्याची संधी मिळत आहे. रिलायन्स जिओ मार्केटमध्ये आल्यापासून इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांना आपले रेट कमी करते लागले आहेत.


आता रिलायन्सने आपल्या ब्रॉडबँड सर्व्हिस घोषणेनंतर आणखी एका मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी आणखी एक मोठे गिफ्ट घेऊन आली आहे. जिओने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्टार इंडिया कंपनीसोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपमुळे जिओ युजर्सला जिओ टीव्हीवर सर्व क्रिकेट मॅच लाईव्ह पाहता येतील. ही पार्टनरशिप पुढील पाच वर्ष राहील. याचा अर्थ जिओ युजर्स पुढील पाच वर्ष लाईव्ह मॅचचा आनंद घेऊ शकतील. या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी युजर्सला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.


या व्यतिरिक्त रिलायन्स जिओ लवकरच 5G सिम लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीकडून टेस्टिंग सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार या सिमची सुरुवातीची किंमत 20 रुपये आहे. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, 5G हाय स्पीडसहित इतर सर्वकाही 3 महिन्यांसाठी फ्री मिळेल. रिपोर्टनुसार हे सिम याच वर्षी लॉन्च होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...