आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानीचे सरप्राइज : यूझर्सला मिळत आहे इतका GB डाटा, तोही मोफत, इथे जाऊन करा अॅक्टिव्हेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गैजेट डेस्क- रिलायंस जियोने यावर्षी यूजर्ससाठी अॅड ऑन सर्व्हीस सुरू केली आहे. यामध्ये यूझरला एक्स्ट्रा 4G डेटा मिळणार आहे. यासाठी युजरकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा डेटा यूझ करण्यासाठी कूपन रि़डीम करावे लागेल. जोपर्यंत तुम्ही रिडीम करणार नाहीत तोपर्यंत याचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे का नाही हे तुम्ही MyJio अॅप मध्ये पाहु शकता.

 

काय आहे अॅड ऑन डाटा

कंपनी सेलिब्रेशन ऑफरच्या अंतर्गत यूझर्सला सरप्राइज डेटा देत आहे. यात 4GB ते 10GB पर्यंत फ्री डेटा दिला जात आहे. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही कस्टमर्संना मिळणार आहे. या ऑफरचा फायदा 30 ऑक्टोबर पर्यंतच असेल. म्हणजे हा डेटा तुम्ही 30 ऑक्टोबर पर्यंत रिडीम केला नाही तर हा डाटा लॅप्स होऊन जाईल.

 

असा मिळेल अॅड ऑनचा फायदा

> सगळ्यात आधी  MyJio अॅप ओपन करुन My Vouchers वर जा.

> इथे प्लान व्हाउचरसोबत प्रोमो वाउचर दिसेल.
> प्रोमो व्हाऊचरच्या समोर अॅड ऑन बेनीफिट्स असेल.
> या व्हाउचर वरुन Redeem करा.
> तुम्हाला जिओ नंबर दिसेल त्याला कन्फर्म करुन OK करा.
> तुम्हाला एक SMS येईल ज्यात अॅड ऑन डाटाची ट्रांजॅक्शन ID असेल.
> आता तुम्ही त्या डाटाचा फायदा घेऊ शकता. 
> या सगळ्या प्रोसेसला साधारण 30 सेकंद इतका वेळ लागतो.

 

नोट : जेव्हा तुमच्या मेन पॅक मधून 4G डाटाची डेली लिमिट संपेल, तेव्हा तुमचा अॅड ऑन पॅक अॅक्टीव्ह होइल. यातला डाटा तुम्ही एका दिवसामध्ये पण वापरु शकता. 

 

जियो दिवाळी ऑफर

जियोने आपला नवीन एक वर्षाचा प्लान पण लॅान्च केला आहे. त्याची किंमत 1699 रुपये आहे. त्यात तुम्हाला 547.5GB 4G डाटा सोबतच अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली 100 SMS, फ्री रोमिंग, फ्री जियो अॅप्स मिळेल. या प्लानची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे.


रिचार्जचे पैसे मिळतील परत

तुम्ही 30 नोव्हेंबर 2018 च्या आधी या प्लानसाठी रिचार्ज केले, तर पूर्ण पैसे परत मिळतील. म्हणजेच 500 चे 3 आणि 200 चे एक कूपन मिळेल. या कुपनचा वापर 31 डिसेंबर 2018 पर्यंतच करू शकता. या कूपनचा उपयोग तुम्ही  रिलायंस डिजिटल वर पण करु शकता. कूपन कोड MyJio च्या  कूपन सेक्शनमध्ये जाउन पाहू शकता. 

 

बातम्या आणखी आहेत...