आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स 'जियो गीगा फायबर' सेवा सुरू: 700 रुपयांत इंटरनेट, मोफत कॉलिंग, एचडी टीव्हीसह डिश... काही ग्राहकांना टीव्ही देखील मोफत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेड डेस्क - रिलायन्स जिओची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा 'जिओ गीगा फायबर' गुरुवारपासून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना किमान 100Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. सोबतच, आयुष्यभर मोफत कॉलिंग, मोफत एचडी टीव्ही आणि डिश दिला जात आहे. या सर्व सेवा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 700 रुपये प्रतिमहा द्यावा लागणार आहे. जिओ लँडलाइनवरून 500 रुपये महिना देऊन अमेरिका आणि कॅनडामध्ये अनलिमिटेड आंतरराष्ट्रीय फोन कॉल सुद्धा केले जाऊ शकतील.

रिलीजिंगच्या दिवशी घरच्या टीव्हीवर पाहा नवीन चित्रपट
जिओ गीगा फायबरचे प्लॅन 700 रुपयांपासून 10,000 रुपये प्रति महा असतील. 2020 मध्ये तर रिलायन्स अशी सेवा घेऊन येत आहे, ज्यात प्रीमियम ग्राहकांना घरबसल्या रिलीजच्या दिवशीच नवीन चित्रपट घरातील टीव्हीवर पाहता येईल. फर्स्ट डे फर्स्ट शो असे या सेवेचे नाव असून ती प्रीमियम ग्राहकांसाठी राहील. यासाठी किती फी आकारली जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. जे ग्राहक वार्षिक प्लॅन घेतील त्यांना एलईडी टीव्ही आणि सेट-अप बॉक्स देण्याचा देखील विचार केला जात आहे.

ब्रॉडबँड प्लॅनच्या माध्यमातून डीटीएच सेवा देखील देणाऱ्या जिओच्या नवीन प्लॅनचा इतर कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. सध्या भारतातील अनेक डीटीएच कंपन्यांचा केवळ एचडी टीव्ही चॅनल्सचा प्लॅन जवळपास 500 रुपयांच्या घरात जातो. जिओ टीव्ही या एचडी चॅनल्ससह चक्क हायस्पीड इंटरनेट आणि कॉलिंगसुद्धा मोजक्या किमतीत उपलब्ध करून देत आहे. जिओ गीगा फायबरमुळे काहींना तत्काळ आपल्या किमती कमी कराव्या लागतील. तर काहींना हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागेल. त्यातही दर्जा कायम ठेवणे हे सर्वांसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.