आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपासून या शहरांमध्ये सुरू होणार jio Gigafiber Service, जाणून घ्या काय होणार फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : रिलायन्स जिओने मागील वर्षी भारतात गीगाफायबर सुविधा सादर केली होती. यानंतर भारतात जिओ गीगाफायबर सुरू होण्याच वाड पाहत होते. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमधील काही भागांत याची चाचणी खूप आधीपासूनच करण्यात येत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिलायन्स जिओ यावर्षी मार्च महिन्यात गीगाफायबर सर्व्हिसची सुरुवात करू शकते. रिलायन्स जिओ देशातील 30 मोठ्या शहरांमध्ये लवकरच ही सुविधा सुरु करणार आहे. गीगाफायबरने लोकांना तीन प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. 

 

या 30 शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हीस
रिलायन्स जिओ सर्वप्रथम बंगळुरू, चेन्नई, रांची पुणे, इंदूर, ठाणे, भोपाळ. लखनऊ, कानपूर, पाटणा, प्रयागराज, रायपूर, नागपूर, गाझियाबाद, लुधियाना, मदुराई, नाशिक, फरीदाबाद, कोईंबतूर, गुवाहाटी, आग्रा, मेरठ, राजकोट, श्रीनगर, अमृतसर, चंढीगड, जोधपूर,, कोटा, नवी दिल्ली आणि सोलापूर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

द्यावे लागतील इतके रुपये
गीगाफायबरमुळे लोकांना प्रतिमहिना 300 जीबी डाटा, डीटीएच कनेक्शन आणि लँडलाईन फोनची सुविधा मिळणार आहे. यासाठी किमान 500 रूपये द्यावे लागणार आहेत. तर इतर वापरकर्त्यांना गीगाफायबर कनेक्शन घेण्यासाठी 4500 रूपये सिक्योरिटी डिपॉजिट द्यावे लागणार आहे. 

 

काय आहे रिलायन्स Jio GigaFiber Service

रिलायन्स गीगाफायबर ही FTTH (फायबर-टू-द-होम) सर्व्हिस आहे. याअंतर्गत हाय-स्पीड फायबरद्वारे फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे 1 Gbpd पर्यंतची स्पीड मिळणार आहे. या सर्व्हिस अंतर्गत एक राउटर आणि एक गीगाटीव्ही सेट-टॉप बॉक्स सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेद्वारे देशातील 1,110 शहर आणि 5 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा हेतू आहे.

बातम्या आणखी आहेत...