Home | Business | Gadget | Reliance Jio might become India's no.1 Telecom Company

Jio देशातील नंबर 1 टेलीकॉम कंपनी होण्याच्या मार्गावर, टेलीकॉमच्या स्पर्धेमध्ये Vodafone आणि Airtel जिओपेक्षा खूपच मागे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 12, 2018, 01:16 PM IST

रिलायन्स जिओने दोन वर्षात सर्व टेलीकॉम कंपन्याना दिली टक्कर

 • Reliance Jio might become India's no.1 Telecom Company

  नवी दिल्ली : मुकेश अंबानींनी 2016 मध्ये लाँच केलेल्या रिलायन्स जिओने पूर्ण टेलीकॉम मार्केट हादरून सोडले आहे. Jio ने दोन वर्षात ग्राहकांना स्वस्त दरातील प्लॅन उपलब्ध करून देत मार्केटवर ताबा मिळवला आहे. जगातील मोठी रिसर्च कंपनी Sanford C. Bernstein & Co. च्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की, रिव्हेन्यूच्या आधारावर 2021 पर्यंत रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी होईल. कारण सध्या मार्केटमधील भारती एअरटेल लिमिटेट आणि वोडाफोन आयडिया लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्याकडे रिलायन्सला टक्कर देण्याइतकी क्षमता नाहीये.


  मार्केटमध्ये जिओचा दबदबा
  2016 मध्ये जिओने सुरूवातीला देशभरात मोफत 4जी वायरलेस सुविधा देण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर जिओने 2017 मध्ये लाइफटाइमसाठी मोफत कॉलची सुविधा प्रदान केली, यासोबतच टॉकटाइम आणि इंटरनेट प्लॅनसाठी कंपन्यांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यानंतर 2017 मध्ये जिओने मोफत इंटरनेट सेवेसाठी शुल्क आकारण्यास सुरूवात केली. आज देशभरात Jio चे 22.7 कोटी युजर्स आहेत. तसेच Jioचे नेटवर्क देशभरातील खेड्यापाड्यात पोहचल्यामुळे जिओला नफा होत आहे.


  दोन वर्षातच गाठले तीसरे स्थान
  जिओची घोडदौड सुरू असल्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील काही कंपन्या मार्केटमधून बाहेर पडल्या आहेत. काही कंपन्यांनी एकमेकांसोबत टाय-अप केले आणि काही कंपन्यांचं दिवाळं निघाले आहे. वोडाफोन आणि आयडिया यांच्या विलीकरणानंतर भारती एअरटेलची प्रथम क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्याची जागा वोडाफोन आयडियाने घेतली आहे. सध्या रिलायन्स जिओ देशातील तिसरी मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे.

  पुढे वाचा.... Jio फोनची टॉप-स्पॉटवर मजल

 • Reliance Jio might become India's no.1 Telecom Company

  Jio फोन पोहोचला टॉप-स्पॉटवर  

   

  Bernstein च्या मते रिलायन्स जिओच्या यशामध्ये जिओ फोनचे मोठे योगदान आहे. कंपनीचा हा फीचर फोन 1500 रूपयांच्या रिफंडेबल किमतीत मिळत आहे. कंपनी या फीचर फोनची विक्री प्रथमस्थानी पोहोचेपर्यंत करत राहणार आहे. 


  पुढे वाचा... इतर कंपन्यांचे शेअर कोलमडत आहेत.  

 • Reliance Jio might become India's no.1 Telecom Company

  कोलमडत आहेत इतर कंपन्यांचे शेअर

   

  गेल्या आठवड्यात देशभरातील दहा सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्यांना बाजार भांडवलात 54,016 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये ITC, HDFC बँक, ICICI बँक आणि SBI बँक तसेच Reliance Industries Ltd चा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 22,153 कोटींनी घटून 7.18 लाख कोटी रुपये झाले आहे.

   

Trending