आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिओची 'न्यु इयर ऑफर'; 1095 रुपयांत फोन खरेदी करा आणि सहा महिन्यांसाठी सर्वकाही मोफत मिळवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गतवर्षी रिलायन्स जिओ कंपनीने देशातील बहूतांश ग्राहकांना आपल्याकडे वळवून टेलीकॉम क्षेत्रात आघाडी मिळवली होती. यावर्षीही रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकाहून एक धमाकेदार ऑफर सादर केल्या आहे. त्यामध्ये कंपनीने 399 च्या रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला आहे. आता नववर्षाच्या निमित्ताने जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राकांना मोठी भेट दिली आहे.  जिओने फक्त 1095 रुपयांत 'न्यु इयर ऑफर' सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत देणार आहे.  

 

अशाप्रकारे तुम्ही उठवू शकतात या न्यु इयर ऑफरचा फायदा
या ऑफरअंतर्गत युझर्सला 500 रुपयांत जिओ फोनसह सहा महिन्यांसाठी 99 रुपयांचे दरमहिन्याचे व्हाउचर्स मोफत मिळणार आहे. यासारख्याच 1095 रुपयांच्या नव्या जिओफोनसोबत सहा महिन्यांसाठी व्हॉइस कॉलिंग आणि डेटा मोफत मिळणार आहे. खास गोष्ट म्हणजे ही स्किम जिओच्या मान्सून हंगाम ऑफरशी जोडलेली आहे. त्यामुळे कस्टमर्स जुन्या फोनच्या बदल्यात नविन फोन एक्सचेंज करु शकतात. जर तुम्हालाही या संधीचा फायदा उठवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओच्या ऑफिशियल वेबसाइटवरुन 1095 रुपयांचे 'जिओ फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड' खरेदी करावे लागणार आहे.

 

12 महिन्यांपर्यंत व्हॅलिड राहील कार्ड
जिओ ग्राहक आपल्या जुन्या सिमकार्डसोबत जुना फोन देवून या ऑफरचा लाभ घेवू शकतात. हे जुने सिमकार्ड 12 महिन्यांपर्यंत व्हॅलिड राहील. या ऑफरशिवाय तुम्ही जिओफोन 500 रुपयांत एक्सचेंजमध्ये घेवू शकतात. परंतू त्यावर तुम्हाला सहा महिन्यांची ऑफर मिळणार नाही.