आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - रिलायन्स जिओ कंपनीने भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना जिओ नेटवर्कसोबत जोडण्याची तयारी सुरू केली आहे. 1 जानेवारी 2019 पासून भारतीय रेल्वेचे सर्व CUG नंबर एअरटेल नेटवर्कमधून रिलायन्स जिओ नेटवर्कमध्ये बदलणार आहेत. भारतीय रेल्वेच्या CUG प्लॅनअंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांनी रिलायन्स जिओची सुविधा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओने वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक प्लॅन तयार केले आहेत.
60 जीबीपर्यंत मिळणार मोफत 4G डेटा
जिओच्या या प्लॅनची किंमतही स्वस्त आहे. या ऑफरमध्ये जिओने चारप्रकारचे प्लॅन सादर केले आहे. प्लॅन 'A'ची किंमत 125 रुपये असुन प्लॅनअंतर्गत नॅशनल आणि लोकल कॉल, रोमिंग सुविधा, दिवसाला 100 एसएमएस आणि 60 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅन 'B'ची किंमत 99 रुपये असुन यामध्ये नॅशनल आणि लोकल कॉल, रोमिंग सुविधा आणि दिवसाला 100 एसएमएस असुन 45 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅन 'C'ची किंमत 67 रुपये असुन इतर सुविधांसोबत 30 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅन 'D'ची किमंत 48 रुपये असुन या प्लॅनमध्ये अनलिमिटेड एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. या ऑफरचा वापर प्रवाशांना एसएमएसद्वारे सुचना देण्यासाठी होणार आहे.
या कर्मचाऱ्यांसाठी आहेत हे प्लॅन
रिलायन्स जिओ कंपनीने सादर केलेली ऑफर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पदानूसार दिली जाणार आहे. उदाहरणार्थ प्लॅन 'A' SAG आणि त्यापेक्षा मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांसाठी, प्लॅन 'A' SG/JAG/SS/JS श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी , प्लॅन 'C' रेल्वेच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असुन प्लॅन 'D'एसएमएससाठी पाठवण्यासाठी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.