आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reliance's Market Capitalization To Reach Rs 14 Lakh Crore In Two Years: Merrill Lynch Estimates

दोन वर्षांत 14 लाख कोटी रुपये होईल रिलायन्सचे बाजार भांडवल : मेरिल लिंचने वर्तवला अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या आधी ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ८ लाख कोटी रुपये झाले होते. बाजार भांडवल ८ लाख रुपये बाजार भांडवल झालेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही देशातील दुसरी कंपनी होती. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच यांच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील दोन वर्षात २० हजार कोटी डॉलर (सुमारे १४ लाख कोटी रुपये) बाजार भांडवल असलेली भारतीय कंपनी होऊ शकते. अहवालानुसार रिलायन्सला २० हजार कोटी डॉलर बाजार भांडवलपर्यंत जाण्यासाठी अनेक कारणे मदतीला आहेत. यात असंघटीत किराणा दुकानात मोबाईल पॉइंट ऑफ सेल लावून किरकोळ व्यवसाय सामिल आहे. मायक्रोसाॅफ्ट सोबत एसएमई सेक्टरमध्ये उतरणे महत्वाचे आहे. हे उद्दीष्ट प्राप्त करण्यात जिओ फायबर ब्रॉडबँडची महत्वाची भूमिका आहे. मुकेश अंबानी यांचा टेलिकॉम व्यवसाय चांगला फायद्यात राहिल.

किराणा दुकानांतून दरमहा ७५० रु. मिळतील
एम- पीओएस बसवण्यासाठी १ कोटी किराणा दुकानं कंपनीला दरमहा ७५० रुपये देतील. अहवालात म्हटले आहे की, २ वर्षात कंपनीच्या ब्रॉडबँड वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या १.२० कोटी होऊ शकते, यातून ६० टक्क्याच्या हिशेबाने दरमहा सरासरी ८४० रुपये मिळतील.

बातम्या आणखी आहेत...